MNS Raj Thackeray in Pune
MNS Raj Thackeray in Pune Sarkarnama
पुणे

भाषणाच्या सुरूवातीलाच राज ठाकरेंनी मन जिंकलं! 'त्या' चौघांना थेट नेत्यांच्या शेजारी बसवलं...

सरकारनामा ब्युरो

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेला सुरूवात झाली आहे. त्यांच्या भाषणाच्या उत्सुकता शिगेला पोहचली आहे. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच हे सभागृह खचाखच भरले आहे. पण भाषणाच्या सुरूवातीलाच त्यांनी मनसैनिकांची मनं जिंकली. (MNS Raj Thackeray Latest Marathi News)

सभागृहात काही अंध विद्यार्थी उपस्थित असल्याची माहिती राज ठाकरे यांना मिळाली होती. भाषणाच्या सुरूवातीलाच त्यांनी हे विद्यार्थी कुठे बसले आहेत, हे पाहिले. त्यानंतर चार विद्यार्थ्यांना थेट व्यासपीठावर घेऊन येण्यास सांगितले. व्यासपीठावर त्यांना इतर नेत्यांना शेजारी पहिल्या रांगेत बसवण्यात आले. राज ठाकरे यांच्या या कृतीचे मनसैनिकांनी टाळ्यांचा गजर करत कौतुक केलं. (Raj Tahckeray Rally in Pune)

दरम्यान, माजी शहराध्यक्ष नेते वसंत मोरे (Vasant More) अजूनही नाराज असल्याचे चित्र आहे. रविवारी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची आज पुण्यात सभा आहे. शेकडो दुचाकींच्या ताफ्यात वसंत मोरे यांनी सभेच्या ठिकाणी आगमन झाले. पण त्याआधीच सभा सुरू झाली होती. मान्यवरांची भाषणे सुरू झाली होती.

सभेच्या ठिकाणी आल्यानंतर वसंत मोरे यांनी माध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा उघडपणे नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, ज्याठिकाणी राजसाहेब तिथे मी उपस्थित राहत असतो. मी पक्षातच आहे. गेल्या महिनाभरापासून खटके उडत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. सध्या चित्र बदलले आहे, असं म्हणत वसंत मोरे यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना सूचक वक्तव्य केलं आहे.

दरम्यान, पक्षाचे प्रमुख राज ठाकरे हे पक्ष कार्यालयात येतील त्याचवेळी तिथे पाय ठेवेन, असा जाहीर निर्धारही मोरेंनी केला होता. यामुळे मनसेतील वाद समोर आला होता. सभेच्या तयारीतही वसंत मोरे सक्रीय नसल्याची चर्चा होती. मागील काही दिवसांपासून पक्षाच्या बैठकांमध्येही त्यांना डावलेले जात असल्याचा आरोप मोरे हे सातत्याने करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT