वसंत मोरे थाटात आले पण नाराजी कायम! सभेच्या ठिकाणी येताच म्हणाले,

राज ठाकरे यांनी गणेश कला क्रीडा मंच येथे सभा सुरू झाली आहे.
MNS Vasant More Latest Marathi News
MNS Vasant More Latest Marathi NewsSarkarnama
Published on
Updated on

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) शहराध्यक्ष नेते वसंत मोरे (Vasant More) अजूनही नाराज असल्याचे चित्र आहे. रविवारी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची आज पुण्यात सभा आहे. शेकडो दुचाकींच्या ताफ्यात वसंत मोरे यांनी सभेच्या ठिकाणी आगमन झाले. पण त्याआधीच सभा सुरू झाली होती. मान्यवरांची भाषणे सुरू झाली होती.

सभेच्या ठिकाणी आल्यानंतर वसंत मोरे यांनी माध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा उघडपणे नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, ज्याठिकाणी राजसाहेब तिथे मी उपस्थित राहत असतो. मी पक्षातच आहे. गेल्या महिनाभरापासून खटके उडत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. सध्या चित्र बदलले आहे, असं म्हणत वसंत मोरे यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना सूचक वक्तव्य केलं आहे.

MNS Vasant More Latest Marathi News
तसे नाही तर असे तरी आलोच...! वसंत मोरे अन् साईनाथ बाबर आले एकत्र

दरम्यान, पक्षाचे प्रमुख राज ठाकरे हे पक्ष कार्यालयात येतील त्याचवेळी तिथे पाय ठेवेन, असा जाहीर निर्धारही मोरेंनी केला होता. यामुळे मनसेतील वाद समोर आला होता. सभेच्या तयारीतही वसंत मोरे सक्रीय नसल्याची चर्चा होती. मागील काही दिवसांपासून पक्षाच्या बैठकांमध्येही त्यांना डावलेले जात असल्याचा आरोप मोरे हे सातत्याने करत आहेत.

दोन दिवसांपूर्वी नीलेश माझिरे यांच्यासह 20 कार्यकर्ते शिवसेनेत जाणार अशी चर्चा होती. माझिरे हे वसंत मोरे यांचे कार्यकर्ते मानले जातात. त्यावरून मोरे यांची नाराजी वाढल्याची चर्चा होती. पण नंतर ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले. माझिरे हे मनसेमध्ये राहणार असल्याचे स्पष्ट झाले. वसंत मोरे यांनी त्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता.

MNS Vasant More Latest Marathi News
आम्ही नक्कीच त्यांना मदत केली असती ; राज ठाकरेचं नेतेपद राऊतांना मान्य ?

दरम्यान, वसंत मोरेंनी नुकतीच एक फेसबुक पोस्ट केली होती. तसे नाही तर असे तरी एकत्र आलोच. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात थोड्याच वेळात हजर होतोय, असे मोरेंनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. या पोस्टमध्ये त्यांचा आणि बाबर यांचं एकत्रित छायाचित्र आहे.

या दोघांवरही शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे महापालिकेत केलेलं आंदोलन या दोघांना भोवलं आहे. या दोघांनाही पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. हे दोघेही आज पोलीस ठाण्यात हजर राहणार आहेत. मात्र, या निमित्ताने दोघे एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com