Rupali Thombre Patil

 

sarkarnama

पुणे

घड्याळ असो की शिवबंधन, पण शैली 'खळखट्याक'चीच राहणार

मनसेतील ते रिकामटेकडे नेते कोण, ज्यामुळे रुपाली पाटलांना (Rupali Thombre Patil) राजीनामा द्यावा लागला, याची चर्चा सध्या सुरु आहे.

सरकारनामा ब्युरो

पुणे : ''मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे.. आपण दिलेलं बळ नेहमी संघर्ष करण्याची प्रेरणा देत. यापुढेही आपले आशीर्वाद आणि "श्री.राज ठाकरे" हे नाव ह्रदयात कोरलेले कायम राहिल' अशी भावना व्यक्त करत रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombre Patil) यांनी मनसेचा राजीनामा दिला आहे. त्या कुठल्या पक्षात जाणार यावरुन राजकीय विश्लेषकांमध्ये चर्चा रंगली आहे.

रुपाली ठोंबरे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. बुधवारी मनसेच्या सदस्याचा आणि सर्व पदांचा राजीनामा दिला असून पक्षातील वरिष्ठ नेत्यांना कारण सांगितले असल्याचे रुपाली ठोंबरे पाटील यांनी सांगितले. ''मनगटी घड्याळ का शिवबंधन बांधणार, हे आज सांयकाळी समजेल,'' असे रुपाली पाटील यांनी एका प्रश्नाला उत्तर देतांना सांगितलं.

रुपाली ठोंबरे-पाटील म्हणाल्या, ''मी पक्षाला नाव ठेवून जाणार नाही, मला राजसाहेब, मनसे कार्यक्रर्त्यांनी मला भरभरुन प्रेम दिलं. मन सैनिक खूप भावनिक, जीव लागणारे आहेत, त्यांना ही गोष्ट माहिती आहे. राजकारणात काम करीत असताना चुका होत असतात. मी काही देव नाही, की चुकणार नाही, असे नाही. मी चुकले तर मला समजून घेणारे नेतेही असतात. मनसेतील रिकामटेकड्या नेत्यामुळे मी जात आहे. याबाबत मला वाद घालायचा नाही. प्रत्येक पक्षाची ध्येय धोरणं असतात. मी ज्या पक्षात जाईल त्या पक्षाच्या ध्येयधोरणानुसार काम करणार आहे. मला लोकांची कामे करायची आहेत,''

ते रिकामटेकडे नेते कोण?

मनसेतील ते रिकामटेकडे नेते कोण, ज्यामुळे रुपाली पाटलांना राजीनामा द्यावा लागला, याची चर्चा सध्या सुरु आहे. ''मनसे सोडताना भावनिक होणारच पण शेवटी निर्णय घ्यावा लागणारच होता. रामाच्या वनवासाप्रमाणे माझाही ही चैादा वर्षांचा वनवास संपल्यानंतर मी 'जय श्रीराम'म्हणून मी पुढे जात आहे. आहे. मी कुठल्याही पक्षात गेले तरी माझी शैली तीच राहिल, तुम्हाला तिचं रुपाली-ठोंबरे पाटील दिसेल,'' असे त्या म्हणाल्या. ''माझ्या मनात कुठेही कुटता नाही. राज ठाकरे माझे दैवत आहेत,'' असे रुपाली पाटील म्हणाल्या.

''मनसे अध्यक्ष राज ठाकरे कायम ह्रदयात राहतील परंतु मनसेचा राजीनामा देत असल्याचेही त्या म्हणाल्या आहेत. मनसेतून बाहेर पडल्यानंतर सध्या दोन राजकीय पक्षांकडून ऑफर देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत भूमिका जाहीर करणार असल्याचे रुपाली पाटील यांनी सांगितले.

रुपाली पाटील यांची पुण्यात मनसेच्या आक्रमक नेत्या आणि डॅशिंग नेत्या म्हणून ओळख होती. महिला, युवक-युवतींच्या प्रश्नांवर त्यांनी विशेष कामं केली. स्थानिक विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरील आंदोलनात त्यांचा सहभाग राहिला आहे. त्यामध्ये त्यांनी तुरुंगवास देखील भोगला आहे.

याआधी त्यांनी पुणे महापालिकेत त्या माजी नगरसेविका होत्या. मनसेत प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या उपाध्यक्षा आणि पुणे मनसेच्या महिला शहराध्यक्षापदही भुषावले होते. तसंच पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सुद्धा रुपाली पाटील यांनी लढवली होती. पण, यात त्यांचा पराभव झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT