mns sarkarnama
पुणे

मोरेंच्या हकालपट्टीनंतर तीन पदाधिकाऱ्यांचे राजीनामे ; गळती रोखण्याचे मनसेसमोर आव्हान

राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत केलेलं वक्तव्य मनसेच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.

सरकारनामा ब्युरो

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत केलेलं वक्तव्य मनसेच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांनी मशिदीवरच्या भोंगावर केलेल्या विधानावर पुण्यात मनसेमध्ये (mns) दुफळी निर्माण झाली आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरु झाले आहे. तीन दिवसात तीन बड्या नेत्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.

माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या या आदेशाचे पुण्यात पालन होणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर मोरेंना शहराध्यक्षपदावरुन हटविण्यात आले. त्यानंतर अनेक पदाधिकारी राजीनामा देण्याच्या मनस्थितीत आहेत. अद्यापर्यंत तीन पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. मनसे शाखाअध्यक्ष माजीद शेख, वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष शाहबाज पंजाबी, शहर उपाध्यक्ष अझरुद्दीन बशीर सय्यद यांनी राजीनामा दिला आहे.

''सध्या रमजान सुरू आहे. त्यामुळे माझ्या प्रभागात मला शांतता हवी आहे. म्हणून असे कोणतेही पाऊल उचलणार नाही. काही अनधिकृत गोष्टी असल्यास राज्य सरकारने त्यावर कारवाई करावी, असे राज ठाकरे यांनी केलेल्या विधानानंतर वसंत मोरे यांनी म्हटले होते.

''मशिदीवरील भोंगे राज्य सरकारनं हटवावे, नाहीतर मनसे कार्यकर्ते ते हटवतील. त्याविरोधात हनुमान चालीसा पटण देखील केले जाईल, असे राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कच्या सभेत म्हटलं आहे. त्याचे पडसाद अद्यापही राज्यात उमटत आहेत. काल मनसेच्या पुणे शहर अध्यक्षपदी साईनाथ बाबर यांची निवड करण्यात आली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाबर यांची ही नियुक्ती केली आहे.

मशिदीवरील अनाधिकृत भोंगे काढण्याबाबत राज्यात मनसे 'खळखट्याक' करण्याचा प्रयत्न करीत असताना दुसरीकडे मुस्लिम समाजाने राज ठाकरे यांचा निषेध केला आहे. पुण्यातील कोंढवा येथील नुरानी कब्रस्थानचे भूमिपूजन राज ठाकरे यांच्या हस्ते झाले होते. त्या बाबतचा फलक येथे लावण्यात आला आहे. या फलकावरील राज ठाकरे यांच्या नावाला स्थानिक लोकांनी काळा रंग लावून राज ठाकरे यांचा निषेध केला आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT