मशिदीवरील भोंग्यावरुन मनसेला पुण्यात आणखी एक झटका

मनसेच्या पुणे शहर उपाध्यक्ष अझरुद्दीन बशीर सय्यद (zharuddin syed)यांनी दिला राजीनामा आहे.
raj Thackeray
raj Thackeraysarkarnama
Published on
Updated on

पुणे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंगे काढण्याच्या विधान नुकतेच गुढी पाडव्याच्या मेळाव्यात केले. त्याचे पडसाद अद्यापही उमटत आहे. मनसेच्या पुणे शहर उपाध्यक्ष अझरुद्दीन बशीर सय्यद (zharuddin syed)यांनी दिला राजीनामा आहे. नवनियुक्त शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्याकडे त्यांनी राजीनामा दिला आहे. यावरुन पुण्यात मनसेमध्ये राजीनामा सत्र सुरु झाले आहे.

मशिदीवरील अनाधिकृत भोंगे काढण्याबाबत राज्यात मनसे 'खळखट्याक' करण्याचा प्रयत्न करीत असताना दुसरीकडे मुस्लिम समाजाने राज ठाकरे यांचा निषेध केला आहे. पुण्यातील कोंढवा येथील नुरानी कब्रस्थानचे भूमिपूजन राज ठाकरे यांच्या हस्ते झाले होते. त्या बाबतचा फलक येथे लावण्यात आला आहे. या फलकावरील राज ठाकरे यांच्या नावाला स्थानिक लोकांनी काळा रंग लावून राज ठाकरे यांचा निषेध केला आहे.

raj Thackeray
मोठी बातमी : वसंत मोरेंना मुख्यमंत्र्यांचा फोन ; शिवसेनेत येण्याची दिली ऑफर

राज ठाकरेंनी केलेल्या त्या विधानानंतर अनेक कार्यकर्ते नाराज आहेत. याआधी देखील मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या या आदेशाचे पुण्यात पालन होणार नसल्याचे स्पष्ट केले होते. ''सध्या रमजान सुरू आहे. त्यामुळे माझ्या प्रभागात मला शांतता हवी आहे. म्हणून असे कोणतेही पाऊल उचलणार नाही. काही अनधिकृत गोष्टी असल्यास राज्य सरकारने त्यावर कारवाई करावी, असेही वसंत मोरे यांनी म्हटले होते.

raj Thackeray
'मनसे'चा फलक फाडला ; मुंब्र्यात राष्ट्रवादी-मनसे आमनेसामने

''मशिदीवरील भोंगे राज्य सरकारनं हटवावे, नाहीतर मनसे कार्यकर्ते ते हटवतील. त्याविरोधात हनुमान चालीसा पटण देखील केले जाईल, असे राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कच्या सभेत म्हटलं आहे. त्याचे पडसाद अद्यापही राज्यात उमटत आहेत. मनसे पदाधिकाऱ्यामध्येही याबाबत मतभेद आहेत. पुण्यात वसंत मोरेंनीही ठाकरेंच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर काल मनसेच्या पुणे शहर अध्यक्षपदी साईनाथ बाबर यांची निवड करण्यात आली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाबर यांची ही नियुक्ती केली आहे. राज ठाकरे यांनी मशिदीवरच्या भोंगावर केलेल्या विधानावर पुण्यात मनसेमध्ये दुफळी निर्माण झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com