MoS Murlidhar Mohol Sarkarnama
पुणे

Murlidhar Mohol Portfolio : मुरलीअण्णांचे विमान उडाले! मोहोळांकडे सहकार आणि नागरी उड्डाण खाते

Modi 3.0 Cabinet Portfolio : पहिल्यांदाच खासदार झालेल्या मुरलीधर मोहोळ यांच्याकडे दोन खात्यांची जबाबदारी देऊन भाजपने त्यांच्यावरील विश्वास दृढ केला आहे.

Sunil Balasaheb Dhumal

Pune Political News : पुण्यातून पहिल्यांदाच खासदार होताच मुरलीधर मोहोळांची केंद्रीय राज्यमंत्री पदी वर्णी लागली. आता त्यांना कोणते खाते मिळणार याकडे पुणेकरांसह राज्याचे लक्ष लागले होते. शपथविधीनंतर 24 तासांतच मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले. यात खासदार मुरलीधर मोहळ यांच्याकडे नागरी उड्डाण आणि सहकार असे दोन राज्यमंत्री पदाचा कारभार सोपवण्यात आला आहे.

मोहोळांनी भाजपचा कार्यकर्ता म्हणून राजकीय कारकीर्द सुरू केली होती. त्यानंतर ते पुणे महानगर पालिकेचे नगरसेवक झाले. नगरसेवक म्हणून त्यांनी केलेल्या लोकाभिमुख कामांची भाजपने दखल घेत त्यांना महापौरपदाची संधी दिली. महापौर म्हणून कारकीर्द यशस्वी केल्यानंतर मुरलीअण्णांना पक्षाने थेट पुण्यातून लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवले आणि सव्वालाख मताधिक्याने विजयी झाले.

मोहळांनी Murlidhar Mohol पुणे हा भाजपचा गड राखल्याने त्यांची थेट राज्यमंत्रीपदासाठी नाव घेतले जात होते. सुरुवातीला त्यांना क्रीडा राज्यमंत्रदाची जबाबदारी देण्यात येईल अशी चर्चा होती. मात्र सरकार आणि नागरी हवाई उड्डाण अशा वजनदार खात्यांची जबाबदारी देत भाजपने मुरलीधर मोहोळांवरील विश्वास अधिकच दृढ केल्याचे दिसून येत आहे.

मोहोळांची कारकीर्द

नागरी हवाई उड्डाण आणि सरकार खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांची राजकीय कारकीर्द भाजपचा कार्यकर्ता म्हणून सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी महापालिकेच्या शिक्षण मंडळ सदस्य, महापालिकेचे नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, पुण्याचे महापौर, भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आदी पदांवर कामे केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT