corona pune
corona pune Sarkarnama
पुणे

पुण्यात एका दिवसात आठ हजारांहून अधिक कोरोनाबाधित; गंभीर रूग्णांचे प्रमाण अल्प

सरकारनामा ब्युरो

पुणे : कोरोना बाधितांचा पुण्यात (Corona in Pune) एका दिवसातील गेल्या पावणेदोन वर्षातील उच्चांक आज गाठला गेला. तब्बल आठ हजार ३०८ रूग्णांची आज नव्याने भर पडली असून ॲक्टिव्ह रूग्णांची संख्या ४५ हजार ८१ इतकी झाली आहे. रूग्णांची संख्या वाढत असली तरी रूग्णालयात दाखल होणाऱ्या रूग्णांचे प्रमाण अत्यल्प आहे.शहरात विषाणूजन्य तापाचे रूग्णदेखील मोठ्या संख्येने आहेत.

आज एकुण १० जणांचा मुत्यू झाला असून यात पुणे शहरातील चार जणांचा समावेश आहे.कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून पहिल्या दोन लाटांपेक्षा रूग्ण सापडण्याचे प्रमाण यावेळी अधिक आहे. आज २० हजार ३३८ रूग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये आठ हजार ३०८ जणांना लागण झाली आहे.दिवसभरात पाच हजार ४८० जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

गेल्या आठवडाभरात पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या रोज नवे आकडे पार करीत आहे.राज्य सरकारने राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वी जाहीर केला. मात्र, स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन संबंधित आधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा, असे म्हटले आहे. पुण्यातील रूग्णांचा रोजचा वाढणारा आकडा लक्षात घेता पुण्यातील शाळा सोमवारपासून सुरू होण्यची शक्यता दिसत नाही. गंभीर रूग्णांचे प्रमाण कमी असले तरी सर्दी, खोकला व तापाचे रूग्ण मोठ्याप्रमाणात आहेत.शालेय वयोगटातील मुलांचाही यात समावेश असल्याने शाळा सुरू करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता फार कमी असल्याचे शिीर क्षेत्रातील सूत्रांनी सांगितले.

पुण्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यासारखी स्थिती नसल्याचे दोन दिवसांपूर्वी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले होते. पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली उद्या (ता.२२) होणाऱ्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.दरम्यान, पुण्यातील सद्यस्थितीची माहिती आपण या बैठकीत देऊ, असे मोहोळ यांनी सांगितले. या स्थितीत पुण्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता दिसत नाही.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT