Amol Kolhe, Nitesh Rane
Amol Kolhe, Nitesh Rane Sarkarnama
पुणे

Amol Kolhe : ''जे वडिलांच्या कर्तृत्वावर पोळ्या भाजणारे आहेत, त्यांनी..''; खासदार कोल्हेंनी नितेश राणेंना सुनावलं

सरकारनामा ब्यूरो

Amol Kolhe On Nitesh Rane : भाजप नेते व आमदार नितेश राणे हे महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डाॅ.अमोल कोल्हे आणि नितेश राणे यांच्यातील आऱोप प्रत्यारोपांच्या फैरींनी राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. लोकसभेच्या 2024 च्या निवडणुकीत अमोल कोल्हेला आपटून टाकू. तो कुठेही भेटू दे दाखवतोच या नितेश राणेंच्या टीकेला खासदार कोल्हे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

खासदार अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. कोल्हे म्हणाले, कोण नितेश राणे? आणि कुठल्या पक्षात आहे? नितेश राणेंची भूमिका ही त्यांच्या पक्षाची अधिकृत भूमिका आहे का? आणि त्यांच्या पक्षाने राणेंच्या वक्तव्यावर काही प्रतिक्रिया दिलेली नाही. जर त्यांचा पक्षच त्यांची दखल घेत नसेल तर मी त्यावर का बोलावं. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पोहचवण्यासाठी त्यांनी काही योगदान दिलं आहे का? अशी विचारणा करत अमोल कोल्हेंनी (Amol Kolhe) राणेंवर निशाणा साधला आहे.

जे वडिलांच्या कर्तृत्वावर पोळ्या भाजणारे आहेत, त्यांनी विचार करुन बोलावं. कारण बोलताना संस्कार प्रकट होत असतात. महाराष्ट्राच्या राजकारणाला सुसंस्कृत पणाचा आदर्श आहे. माईकवरच बोलायचं असेल तर मला ही बोलता येतं. पण इतिहास मांडण्यासाठी मी राजकारण आणत नाही. तसेच सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मला आलेल्या लोकांनी जास्त बोलू नये असे खडेबोलही खासदार कोल्हेनी नितेश राणेंना सुनावले आहे.

नितेश राणे नेमकं काय म्हणाले होते?

भाजप आमदार नितेश राणे यांनी खासदार अमोल कोल्हेंवर हल्लाबोल केला होता. यावेळी राणे यांनी लोकसभेच्या 2024 च्या निवडणुकीत अमोल कोल्हेला आपटून टाकू. कोल्हे कुठेही भेटू दे, त्याला दाखवतोच असं विधान केलं होतं. तसेच तो कुठला अमोल कोल्हे नावाचा ॲक्टर. पैसे घेऊन शिवाजी महाराजांचे रोल करतो. तो काही फुकट करत नाही. नावासाठी खासदार झाला आहे. दाढी काढली तर कोणी ओळखणार पण नाही. तो सिरीयल पुरताच आहे. आणि अजितदादांना कोल्हे लिहून देतो आणि ते वाचून दाखवतात अशी बोचरी टीका राणे यांनी केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT