Ajit Pawar, Amol Kolhe Sarkarnama
पुणे

MP Amol Kolhe News : पराभव समोर दिसू लागल्यानेच 'दादां'कडून वैयक्तिक टीका; खासदार कोल्हेंचा आरोप !

Shirur Lok Sabha Constituency : लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जाताना महायुतीकडे कोणतेही धोरणात्मक मुद्दे नाहीत..

Sudesh Mitkar

Pune Political News : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. राज्यातील ४८ जागांसाठी लोकसभा निवडणूक पार पडत असून, पाच टप्प्यांत या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत अनेक मतदारसंघांत पहायला मिळणार असून, बहुतांश मतदारसंघांत उमेदवारांची नावे निश्चित झाली आहेत. मतदानाची तारीख जशी जवळ येत आहे, तशी प्रचारातील रंगत अधिक वाढत असल्याचे दिसून येत आहे.

निवडणुकीच्या प्रचारात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप, टीका टिप्पणी केली जात आहे. गेले दहा वर्षे केंद्रात भारतीय जनता पक्षाची (BJP) सत्ता आहे. त्यांनी विकास केला आहे, हे कारण पुढे करत राज्यात सत्ताधारी असलेल्या शिवसेना शिंदे गटाने तसेच राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे भाजपबरोबर महायुतीत सहभागी झाले आहेत, असा दावा केला जात आहे. मात्र, लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जाताना महायुतीकडे कोणतेही धोरणात्मक मुद्दे नाहीत. त्यामुळेच महायुतीच्या नेत्यांकडून वैयक्तिक टीका केली जात असल्याचा आरोप केला जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महायुतीमध्ये विकासाच्या मुद्द्यांसाठी सहभागी झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हेदेखील सध्या विकासाच्या मुद्द्यांवर बोलण्यापेक्षा वैयक्तिक टीकाच करत असल्याचा आरोप करण्यात आला. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे शिरूर (Shirur) लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी हा आरोप केला आहे. प्रचार करताना विकासाचे मुद्दे नसल्यानेच अशा पद्धतीने वैयक्तिक टीका होत असल्याचे त्यांनी सांगितले.

महाविकास आघाडी व इंडिया फ्रंट आघाडी लोकसभा (Lok-Sabha) निवडणूक 2014 च्या अधिकृत उमेदवारांची प्रचार शुभारंभाची सभा आज पुण्यात पार पडली. या सभेपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार डॉ. कोल्हे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर शांताई हॉटेल समोर महाविकास आघाडीतील तिन्ही उमेदवारांसाठी प्रचारची शुभारंभ सभा घेण्यात आली.

जेष्ठ नेते शरद पवार, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, मोहन जोशी, विश्वजित कदम, संग्राम थोपटे, संजय जगताप, शिवसेनेचे सुषमा अंधारे, सचिन आहेर, आपचे नेते अजित पाटील, भूषणसिंहराजे गजेंद्रसिंहराजे होळकर यांच्यासह बारामती आणि पुणे लोकसभेचे उमेदवार सुप्रिया सुळे, रवींद्र धंगेकर या वेळी उपस्थित होते.

कोल्हे म्हणाले, प्रचाराची दुसरी आणि तिसरी फेरी सुरू असताना देशातील आणि राज्यातील जनतेचे ठरले की, स्वाभिमानाने 'तुतारी' फुंकायची आणि 'मशाल' पेटवायची. मात्र, विरोधकांकडे कोणतेही धोरणात्मक मुद्दे नसल्याने महायुतीच्या नेत्यांकडून सर्रासपणे वैयक्तिक टीका केली जात आहे. त्यांच्या या आरोपांना मतदार भुलणार नाही. विकासाच्या प्रश्नावर महाविकास आघाडी काम करण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे.

मला नटसम्राट म्हटले जाते, कार्यसम्राट परवडतो पण खोकेसम्राट, पलटीसम्राट चालत नाही. कचाकचा बटन दाबा तुम्हाला हवा तेवढा निधी देतो, या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याचादेखील डॉ. कोल्हे यांनी कडक शब्दांत समाचार घेतला. लोकशाहीची थट्टा करता का? असा प्रश्न उपस्थित करत, तुम्ही जो निधी देणार म्हणून सांगता, तो तुमचा नाही तर जनतेचा पैसा आहे. स्वतःची मालकी असल्यासारखे वागत असाल तर हा कर त्याच दोन टक्के लोकांकडून घेतला जावा. सत्तेची इतकी मस्ती, गुर्मी येते कोठून? असा थेट सवालही डॉ. कोल्हे यांनी केला आहे.

Edited By : Chaitanya Machale

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT