Murlidhar Mohol News : मुरलीधर मोहोळ यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंग केल्याची तक्रार

Congress News : धार्मिक प्रलोभन दाखवून मोहोळ यांनी मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा दावा काँग्रेसने तक्रारीत केला आहे.
Murlidhar Mohol
Murlidhar MoholSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol News) यांच्याविरुद्ध काँग्रेसने आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल केली आहे. मोहोळ यांनी वर्तमानपत्राच्या माध्यमातून "राम मंदिर झाले आता राष्ट्र मंदिरासाठी संकल्प करूयात" या मथळ्याखाली जाहिरात करून धार्मिक प्रलोभन दाखवल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे अयोध्येतील राममूर्तीच्या पाया पडत आहेत, असे छायाचित्रं असलेली पत्रकेही मोहोळ यांच्यामार्फत वाटण्यात आली आहेत. या प्रकरणी काँग्रेसकडून तक्रार करण्यात आली आहे. माजी आमदार मोहन जोशी व काँग्रेसचे (Congress) सोशल मीडिया राज्य समन्वयक चैतन्य पुरंदरे यांनी याविषयी माहिती दिली.

Murlidhar Mohol
Baramati Lok Sabha News : बारामतीत अजितदादांनी ‘अशी’ केली जुळवाजुळव; स्टेजवरून सांगितली शिलेदारांची नावं

"राम मंदिराला निवडणूक प्रचाराचा मुद्दा बनवून याद्वारे धार्मिक प्रलोभन दाखवून मोहोळ यांनी मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे," असे जोशी व पुरंदरेंनी सांगितले. त्यानुसार आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी पुरंदरे यांनी मोहोळ यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने पुरंदरे यांची भेट घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता मोहोळ यांनी खरंच आचारसंहितेचा भंग केला की नाही, याबाबत आयोगाकडून लवकरच माहिती समोर येईल.

दरम्यान, आज महाविकास आघाडीचे पुण्यातील उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासह शिरूर मतदारसंघातील उमेदवार अमोल कोल्हे आणि बारामती मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याचप्रमाणे महायुतीच्या बारामती मतदारसंघातील उमेदवार सुनेत्रा पवार यांनीही आज अर्ज दाखल केला. सर्व उमेदवारांकडून शक्तिप्रदर्शन करण्यात आले.

सुनेत्रा पवार यांचा अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह मतदारसंघातील महायुतीचे आमदार, नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी शिंदे, फडणवीसांसह अजितदादांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडलं.

R

Murlidhar Mohol
Supriya Sule Latest News : ...तर दादाही मला मतदान करतील' सुप्रिया सुळेंना का वाटतो एवढा विश्वास

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com