Amol Kolhe Sarkarnama
पुणे

अगर जीत का सेहरा बंधवाना हो तो, पराजय का बोझ भी स्वीकारना होगा!

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी गुरूवारी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात (Parliament Winter Session) गुरूवारी देशातील कोरोनाच्या (Corona) स्थितीवर जोरदार चर्चा झाली. या चर्चेत सहभाग घेताना राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr Amol Kolhe) यांनी मोदी सरकारवर प्रश्नांचा भडिमार केला. कोणत्याही लढाईत सेनापतीने स्वतःचे उदाहरण समोर ठेवले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करताना कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही लक्ष्य केले.

कोल्हे यांनी पश्चिम बंगालमधील निवडणूकीचे उदाहरण देताना पंतप्रधानांच्या सभांमध्ये झालेल्या गर्दीमुळे कोरोना नियमांचा उडालेला फज्जा याकडे लक्षय वेधले. तसेच लसीकरण प्रमाणपत्रावरील पंतप्रधानांच्या फोटोवरूनही त्यांनी निशाणा साधला. कोल्हे यांनी भाषणादरम्यान कोरोनाशी दोन हात करणाऱे डॉक्टर, परिचारिका, आशा वर्कर्ससह यांसह सर्वच कोरोना योद्ध्यांची प्रशंसा केली.

त्याचप्रमाणे लढाई जिंकण्याचे श्रेय घ्यायचे असेल तर झालेल्या मृत्युंची जबाबदारीही केंद्र सरकारला घ्यावी लागेल, असे स्पष्टपणे बजावले. 'अगर जीत का सेहरा बंधवाना हो तो, पराजय का बोझ भी स्वीकारना होगा', असं सांगत त्यांनी लसीकरण प्रमाणपत्रावर फोटो छापायचा असेल तर मृत्यू प्रमाणपत्राची जबाबदारीही घ्यावी, असं कोल्हे म्हणाले.

'ओमिक्रॉन'बाबत आज देशभरात भीती निर्माण झाली आहे. कोरोना संकटकाळात अनेक कंपन्या बंद पडल्या, अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपात केली. त्यांच्या भविष्याबाबत आपल्याला विचार करावा लागेल अशी अपेक्षा कोल्हे यांनी व्यक्त केली. याचवेळी त्यांनी कोरोना काळात महाराष्ट्र सरकारने केलेल्या कामाचेही कौतूक केले. या लढाईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे व प्रशासकीय अधिकारी यांनी यांनी कौतुकास्पद काम केलं. तसेच औरंगाबाद मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडे, मुंबईचे मनपा आयुक्त इक्बाल सिंह चहल व पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांचेही विशेष कौतुक कोल्हे यांनी केले.

कोरोनामुळे आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या अनाथ मुलांसाठी खासदार सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी काँग्रेस च्यावतीने 'राष्ट्रवादी जीवलग' अभियान राबवत आहेत. हे अभियान देशभर राबविण्याची मागणी कोल्हे यांनी यावेळी केली. 'जगदंब प्रतिष्ठान'च्या माध्यमातून सीएसआर निधीतून शासकीय मदतीशिवाय शिरुर मतदारसंघात 5 लाख नागरिकांचे लसीकरण केल्याचे कोल्हे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT