BJP MP Medha Kulkarni alleges illegal encroachment of Hindu temple land by the Waqf Board; sarkarnama
पुणे

Waqf Board Land Issue : '1200 वर्ष जुनी बारव, हिंदू देवस्थानाची जमीन वक्फ बोर्डाने बळकावली', मेधा कुलकर्णी आक्रमक, थेट जिल्हाधिकाऱ्यांना...

Waqf Board MP Medha Kulkarni : मेधा कुलकर्णी यांनी सांगितले की, 'मंचर शहरातील 1200 वर्ष जुनी यादवकालीन बारव वक्फ बोर्डाने अनधिकृतपणे बळकावली असल्याची तक्रार हिंदू संघटनांनी माझ्याकडे केली.

Sudesh Mitkar

Pune News : भाजप खासदार मेधा कुलकर्णी गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती अधिक आक्रमकपणे भूमिका घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. वक्फ बोर्डाकडून हिंदू वारसा स्थळांचा अनधिकृतपणे ताबा घेण्यात आला असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या मुद्यावर त्या आक्रमक झाल्या असून या विषयी त्यांनी थेट पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे.

मेधा कुलकर्णी यांनी सांगितले की, 'मंचर शहरातील 1200 वर्ष जुनी यादवकालीन बारव वक्फ बोर्डाने अनधिकृतपणे बळकावली असल्याची तक्रार हिंदू संघटनांनी माझ्याकडे केली. बारव परिसरात हे स्थळ यादवकालीन असून हिंदू धर्माच्या अस्तित्वाचे विविध पुरावे या ठिकाणी आढळून येतात. या ठिकाणी प्राचीन हिंदू बारव असल्याचे शासकीय अहवालात नमूद केले असताना सुद्धा स्थानिक शासकीय अधिकाऱ्यांनी या संदर्भात कुठलीही कारवाई केली नसल्याचे तक्रारदारांनी माझ्या निदर्शनास आणून दिली.'

'पुणे जिल्ह्यातील निर्वी, शिरूर येथील श्री पीर देव देवस्थानच्या भूखंडावर वक्फ बोर्डाने अनधिकृतपणे ताबा मारत त्या ठिकाणी मशिद व अन्य बांधकाम केल्याची तक्रार निर्वी येथील ग्रामस्थांनी माझ्याकडे केली. तसेच हिंदूंच्या प्राचीन मंदिराचे अस्तित्व असलेल्या या परिसरामध्ये मुस्लिम समुदायाकडून प्राण्यांचे बळी दिले जातात. या प्रकाराविरोधात तक्रार करणाऱ्या हिंदू बांधवांवर खोटे गुन्हे दाखल केले जातात', अशी माहिती निर्वीतील ग्रामस्थांनी आपल्याला दिल्याचे मेधा कुलकर्णी यांनी सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाईचे आश्वासन

1200 वर्ष जुनी यादवकालीन बारव तसेच निर्वी या दोन्ही ठिकाणी वक्फ बोर्डाने मारलेला ताबा हटवण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन हा गंभीर प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणीची घोषणा करत प्रकरणाची शहानिशा करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती देखील कुलकर्णी यांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT