Sanjay Raut Vs Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Sanjay Raut Vs Ajit Pawar: ...तर बारामतीत अजित पवार राजदूतवर दूध विकत असते!

Baramati Lok Sabha Constituency 2024: शरद पवार यांनी तुम्हाला वाढायला भांडे दिले आहे. म्हणून तुम्ही वाढत आहात नाहीतर तुमच्या वरती पत्रावळी उचलण्याची वेळ आली असती. अजित पवार जे काम करत आहेत.

Sudesh Mitkar

Pune News: बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी आज खासदार संजय राऊत हे प्रचार मैदानात उतरले आहेत. संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समवेत सासवड येथे सभा होत आहे. तत्पूर्वी त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री अजित पवारांवर (Ajit Pawar) यांच्यावर सडकून टीका केली.

संजय राऊत म्हणाले, "बारामती, शिरूर मतदार संघामध्ये अजित पवार जाहीरपणे धमक्या देत आहे. व्यापारी उद्योजक यांना दंड लावण्याच्या धमक्या देऊन अजित पवार गटाचे आणि त्यांच्या पत्नीचे काम करायला भाग पाडला जात आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha Constituency 2024) अजित पवार गावागावांमध्ये धमक्या देत आहेत. मला जर मताधिक्य पडले नाही तर बघून घेईल ही भाषा अजित पवारांना शोभत नाही. खरच जर फेअर निवडणूक घ्यायची असेल तर जनतेला ठरू द्यात तुम्ही खरे का शरद पवार खरे अशी टीका संजय राऊत यांनी केली.

बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही महाराष्ट्राच्या अस्मितेची निवडणूक आहे. गुजरात मधून नेते येऊन बारामतीमध्ये शरद पवार यांचा पराभव करण्याच्या वल्गना करत आहेत. बारामतीमध्ये आम्ही शरद पवारांचा पराभव केलाय हे त्यांना देशाला दाखवायचे आहे मात्र ते शक्य होणार नाही, असे राऊत म्हणाले.

अजित पवार हे सध्या बारामतीमध्ये तळ ठोकून आहेत. मात्र त्याने कसलाही फरक पडणार नाही. अजित पवार म्हणतात मी कोणतीही निवडणूक जिंकण्यासाठीच मैदानात उतरतो असं सांगत तर मग पार्थ पवार यांचा पराभव का? झाला असा सवाल यावेळी राऊत यांनी विचारला. पार्थ पवार यांचा निवडणुकीत पराभव झाला असून आता सुनेत्रा पवार यांच्या पराभवाची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी टीका त्यांनी केली.

"अजित पवार म्हणतात की मी वाढपी आहे. मी ठरवेल कोणाला किती द्यायचं. परंतु शरद पवार यांनी तुम्हाला वाढायला भांडे दिले आहे. म्हणून तुम्ही वाढत आहात नाहीतर तुमच्या वरती पत्रावळी उचलण्याची वेळ आली असती. अजित पवार जे काम करत आहेत. त्याचं सामर्थ्य त्यांना सुप्रिया सुळे यांच्या वडिलांनीच म्हणजेच शरद पवारांनी दिला आहे. नाहीतर तुम्हाला बारामती मध्ये राजदूतवर दूध विकावं लागलं असतं," अशी खोचक टीका त्यांनी अजित पवारांवर केली.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT