Kolhe Vs Adhalarao: रडीचा डाव कोण खेळतयं; कोल्हे- आढळरावांमध्ये जुंपली

shirur loksabha constituency 2024: खासदार झाल्यापासून कोल्हेंचा मतदारसंघात जनसंपर्क नाही. हा मुद्दा विरोधकांकडून प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आला आहे. त्यामुळे काही गावांमध्ये गावकरी कोल्हेंना घेरतायेत. पाच वर्षे कुठं गायब होता?
Kolhe Vs Adhalarao
Kolhe Vs AdhalaraoSarkarnama

शिरुर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivaji Adhalarao Patil) आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यातील लढत रंगात आली आहे. अमोल कोल्हे (amol kolhe) यांच्या प्रचाराला जोर धरला आहे. पण अनेक गावात त्यांची पंचायत केली जात असल्याचे चित्र आहे, यामागे आढळरावांचे कार्यकर्ते असल्याचा आरोप अमोल कोल्हेंनी केला आहे.

आढळवार हा रडीचा डाव खेळत आहे, असल्याचे कोल्हेंनी म्हटलं आहे. त्यावर अशी नाटकं करण्यात कोल्हे पटाईत असल्याचे सांगत आढळवारांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. खासदार झाल्यापासून कोल्हेंचा मतदारसंघात जनसंपर्क नाही. हा मुद्दा विरोधकांकडून प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आला आहे. त्यामुळे काही गावांमध्ये गावकरी कोल्हेंना घेरतायेत. पाच वर्षे कुठं गायब होता? खासदार म्हणून आमच्यासाठी काय केलं? आता आमच्या गावात कशाला येताय? आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या? अशा रोषाला अमोल कोल्हेंना सामोरं जावं लागत आहे. तर काही ठिकाणी कोल्हे दिसताच मोदी-मोदी अशी घोषणाबाजी होत आहे.

आढळराव त्यांचे कार्यकर्ते गावागावात पेरतायेत. त्यांच्याकडून असे उद्योग केले जात आहे. त्याचे व्हिडीओ बनवून मतदारसंघात व्हायरल केले जाता आहेत, आढळराव हा रडीचा डाव खेळतायेत, असे कोल्हे म्हणाले. गेल्या लोकसभेत मुंबईमध्ये त्यांच्या सांगण्यावरून मला पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. त्यामुळं माणसं पेरायची सवय कोल्हेंची आहे, असा पलटवार आढळरावांनी केला आहे.

जी व्यक्ती २२ जणांची नावे निश्चित करीत होती, त्या व्यक्तींला आता चार जागांवर समाधान मानावे लागत आहे, अशी टीका अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी शिरुर लोकसभेची जागा प्रतिष्ठेची केली आहे. या मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Kolhe Vs Adhalarao
Supriya Sule News: मोदींचे आम्ही तुतारी वाजवून आदराने स्वागत करू; सुळेंची खोचक प्रतिक्रिया

'आपणच विजयी होऊ,' असा दावा दोन्ही पवारांच्या उमेदवारांनी केला असला तरी कोणाच्याही गळ्यात विजयाची माळ पडली, तरी त्यात निर्णायकी भूमिका भोसरी विधानसभा मतदारसंघ बजावणार आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघ हा शिरुरमध्ये सर्वाधिक मोठा आहे. गेल्यावेळी 2019 ला शिरुरमधील इतर पाच विधानसभा मतदारसंघापेक्षा जास्त मतदान भोसरीत झाले होते. तसेच तेथील मताधिक्यही शिरुरमध्ये सर्वाधिक होते. तो पिंपरी-चिंचवडमधील तीनपैकी एक विधानसभेचा मतदारसंघ आहे. त्यामुळे या शहरी भागात यावेळीही सर्वाधिक मतदान अधिक होईल, असा अंदाज आहे.जे गतवेळसारखे निर्णायक ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com