Laxman Jagtap,  Shrirang Barne
Laxman Jagtap, Shrirang Barne  sarkarnama
पुणे

Modi government Expansion : पिंपरी-चिंचवडला मंत्रीपदाची संधी ; श्रीरंग बारणे होणार केंद्रीय राज्यमंत्री?

उत्तम कुटे

पिंपरी : केंद्रीय मंत्रीमंडळाचा लवकरच विस्तार होऊ घातला आहे. त्यात भाजपला नव्याने साथ दिलेल्या शिंदे गटाला मंत्रीपदं दिली जाणार आहेत.त्यासाठी पिंपरी-चिंचवडचे प्रतिनिधीत्व करणारे मावळचे शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार श्रीरंग बारणे (MP Shrirang Barn) यांचे नाव घेतले जात आहे. (Modi government Expansion news update)

'अप्पा'या नावाने परिचित असलेले बारणे हे मंत्री झाले,तर उद्योगनगरीचे मंत्रीपदाचे स्वप्न साकार होणार आहे.विधानसभेला आमदारकीची हॅटट्रिक केलेले चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप ( Laxman Jagtap) यांना राज्यात मंत्रीपद मिळेल,अशी आशा होती.पण, त्यांचे ३ जानेवारीला निधन झाल्याने तूर्त शहरवासियांची निराशा झाली आहे.

आतापर्यंत मंत्रीपदाने त्यातही राज्यातील पिंपरी-चिंचवडला नेहमीच हुलकावणी दिली आहे. मात्र,आता ती संधी पुन्हा आय़तीच चालून आली आहे,पण राज्यात नाही,तर थेट केंद्रात.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, नितीशकुमार आणि सुखबीरसिंग बादल हे तीन गट केंद्र सरकारमधून बाहेर पडल्याने त्यांना दिलेली मंत्रीपदे रिक्त झाली आहेत. दुसरीकडे शिंदे गट आता केंद्रातील भाजपला नव्याने मिळाला आहे.

त्यामुळे ही रिक्त पदे या नव्या भिडूला भाजप देणार आहे. ती देतानाही आगामी महापालिका निवडणुकीचा आडाखा त्यामागे आहे. मुंबई पालिका भाजपला ताब्यात घ्यायची असल्याने त्यासाठी रसद म्हणून शिंदे गटाचे मुंबईतील खासदार राहूल शेवाळे यांना राज्यमंत्री केंद्रात दिले जाऊ शकते.फक्त त्यांच्यावर झालेले आरोप हाच काय तो या मार्गात अडथळा आहे.

पवार कुटुंबाला चेक आणि पिंपरी-चिंचवड,पुण्याची महापालिका ताब्यात ठेवण्यासाठी याच गटाचे (बाळासाहेबांची शिवसेना) बारणे यांनाही हे मंत्रीपद मिळेल,अशी चर्चा आहे.

त्यांचे काम,निष्कलंक चारित्र्य,सर्व पक्षीयांशी असलेले सलोख्याचे सबंध,पवार कुटुंबातील सदस्याचा त्यांनी गतवेळी केलेला पराभव आणि खासदारकीची दुसरी टर्म या त्यांच्या जमेच्या बाजू मंत्रीपदासाठी आहेत.तर, बुलढाण्याचे शिंदे गटाचे खासदारीचे हॅटट्रिक केलेले प्रताप जाधव यांचे, तर कॅबिनेटमंत्री म्हणून नाव घेतले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT