BRS News : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्राच्या राजकारणात एन्ट्री ; BRS या माध्यमातून होतोयं सक्रीय

Chandrashekhar Rao News : चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीने देशभर पक्ष वाढविण्यासाठी सुरवात केली आहे.
Chandrashekhar Rao BRS News
Chandrashekhar Rao BRS Newssarkarnama
Published on
Updated on

Chandrashekhar Rao News : तेलंगणामध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका आहेत. त्यासाठी आतापासूनच तेलंगणामध्ये राजकीय वातावरण तापू लागले आहे. ११९ पैकी १०४ आमदारांचे समर्थन असलेल्या मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (Chandrashekhar Rao) यांच्या भारत राष्ट्र समितीने (पूर्वाश्रमीची तेलंगण राष्ट्र समिती) देशभर पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु केला आहे.

मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती (BRS) एन्ट्री महाराष्ट्रात (maharashtra) झाली आहे. यापूर्वी एमआयएमची सुरुवात नांदेडमधूनच झाली होती, आता याचा नांदेडमधून शेतकरी संघटनेच्या माध्यमातून बीआरएसचीची एन्ट्री होत आहे. नांदेड जिल्ह्यात बीआरएसचे काम बाबूराव कदम पाहत आहेत.

तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या धर्माबाद तालुक्यापासून ते नांदेड-परभणीमध्ये शेतकरी नेत्यांच्या माध्यमातून भारत राष्ट्र समिती (BRS) महाराष्ट्रात प्रवेश करीत आहे. तेलंगणाच्या विकासविषयक जाहिराती मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध केल्या जात आहेत. या जाहिरातीच्या माध्यमातून तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांकडून कृषी धोरणांचा प्रसार केला जात आहे. रयतबंधू योजनचा प्रसार नांदेडमध्ये सुरु आहे.

कृषी क्षेत्राशी कार्यरत मंडळींना तेलंगणात बोलावून, त्यांच्याशी चर्चा करून त्यांना आपल्या बाजूला वळवण्याच्या प्रयत्न तेलंगणा सरकार करीत आहेत.तेलंगणामधल्या बीआरएसची सुरुवात नांदेडमधून करण्यात येत आहे.

Chandrashekhar Rao BRS News
BrijBhushan Singh News : लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या बृजभूषण सिंहांबाबत क्रीडामंत्री आज घेणार मोठा निर्णय

विदर्भात लोकजागर अभियान राबवणारे सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश वाकुडकरांनीही यापूर्वी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट घेतली आहे.विदर्भातील कृषी अभ्यासक विजय जावंधिया यांनी डिसेंबरमध्ये राव यांची भेट घेतली.

चंद्रशेखर राव यांच्या शेतकरी कल्याणाविषयी धोरणांमुळे ज्ञानेश वाकुडकर देखील प्रभावित झाले आहेत. त्यांनी अद्याप पक्षात प्रवेश केलेला नाही, मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर देशात कुठलेच निर्णय होत नसताना चंद्रशेखर राव यांची धोरणे शेतकऱ्यासाठी फायद्याची असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

Chandrashekhar Rao BRS News
Parliament Budget Session 2023 : मोदी सरकारचे दाबे दणाणले ; अर्थमंत्रालयाची माहिती एकाने परदेशी लोकांना पुरवली...

डिसेंबरमध्ये विजय जावंधिया यांनी मुख्यमंत्री राव यांची भेट घेतली होती. रयतबंधू योजना राबवणार असल्याचे जाहीर केले तर आपण विनाशर्त या पक्षात सामील होणार असल्याचे जावंधिया यांनी सांगितले होते.

काय आहे रयतबंधू योजना

तेलंगणात रयतबंधू योजनेत शेतकऱ्यांना प्रतिएकर दहा हजार रुपये दिले जातात. त्यासाठी एकरची मर्यादा नाही. वीज मोफत दिली जाते. पाणीपट्टी आकारली जात नाही. पीक विम्याचे सर्व पैसे सरकार भरते. तसेच सर्व धान खरेदी केले जाते. त्यामुळे तेलंगणाची धोरणे शेतकरीपूरक व देशात लोकप्रिय होत आहेत,

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com