Supriya Sule Vs Ajit Pawar  Sarkarnama
पुणे

Supriya Sule: अजितदादांना 'करारा जबाब' देत सुप्रियाताई म्हणाल्या, "भाषण ऐकून माझी आई मला खूप ओरडणार..."

Vadgaon Sheri Assembly Constituency Bapusaheb Pathare: ते म्हणाले कुणाची अंडी पिल्ली माहित आहेत. जशी तुम्हाला येथील माहित आहे, तशी आम्हालाही माहीत आहेत. त्यामुळे जुनं काही बोलू नका आणि जर काढलंच तर 'यहा से भी करारा जबाब मिलेगा'

Sudesh Mitkar

Pune News : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. प्रचार सभेच्या माध्यमातून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या विधानाला प्रत्युत्तर देताना खासदार सुप्रिया सुळे यांनी 'करारा जवाब मिलेगा' म्हणत टीका केली आहे.

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार सुनील टिंगरे निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने माजी आमदार बापू पठारे यांना मैदानात उतरवले आहे.

अजित पवार यांनी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात शुक्रवारी प्रचार सभा घेतली. प्रचार सभेमध्ये बोलताना अजित पवारांनी विरोधी उमेदवार निशाणा साधला अजित पवार म्हणाले, काही लोक कार्यकर्त्यांना धमकवत आहेत. त्यांच्या यांच्याकडून दडपशाही, दमदाटी चालू असल्याचे समजले. आम्ही काही हातात बांगड्या भरल्या नाहीत. तुम्हाला स्थायी समिती, आमदारकी मीच दिली होती. तुमची सगळी अंडी पिल्ली माझ्याकडे आहेत, असा इशारा अजित पवार यांनी पठारेंना दिला.

सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी पुणे शहरात जोरदार प्रचार केला. शिवाजीनगर कसबा विधानसभा आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघात त्यांची रॅली झाली. त्यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघात मेळाव्याला संबोधित केलं.

यानंतर सुप्रिया सुळे यांची बापू पठारे यांच्या प्रचारार्थ सभा झाली. सुळे म्हणाल्या, "काही वेळापूर्वी इथे येऊन एका नेत्यांनी भाषण केलं की अनेक लोकांना मी संधी दिली, पक्षाने नाही मी...आता मी जे बोलते ती भाषणाची स्टाईल माझी नाही, माझं हे भाषण ऐकून माझी आई मला खूप ओरडणार आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुळे पुढे म्हणाल्या, येथे येऊन ते म्हणाले कुणाची अंडी पिल्ली माहित आहेत. जशी तुम्हाला येथीली माहित आहे तशी आम्हालाही माहीत आहेत. त्यामुळे जुनं काही बोलू नका आणि जर काढलंच तर 'यहा से भी करारा जबाब मिलेगा' असा इशारा नाव न घेता सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना दिला.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT