Nawapur News: नवापूर विधानसभा मतदारसंघावर सुरुवातीपासून काँग्रेसचा दबदबा आहे. या मतदारसंघातून दिवंगत नेते माणिकराव गावित आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक यांनी नेतृत्व केले आहे. या विधासभा निवडणुकीत नवापूरमध्ये (Nawapur Vidhan Sabha Nivadnuk election 2024) तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
काँग्रेसचा गड मानला जाणारा या विधानसभा क्षेत्रात काँग्रेसच्या शिरीष कुमार नाईक यांना उमेदवारी देण्यात आलेले आहेत तर दुसरीकडे माजी केंद्रीय राज्य मंत्री राहिलेले माणिकराव गावित यांचे सुपुत्र भरत गावित (Bharat Gavit) हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून रिंगणात आहेत.
गेल्या निवडणूकीत काँग्रेसचे दोन्ही ज्येष्ठ नेत्यांच्या मुलांमध्ये सामना रंगला होता. काँग्रेसतर्फे शिरीषकुमार नाईक तर भाजपातर्फे भरत गावित हे निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यात काँग्रेसचे शिरीषकुमार नाईक यांचा विजय झाला.
सद्यस्थितीत भरत गावित यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून (अजित पवार) उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसतर्फे विद्यमान आमदार शिरीषकुमार नाईक यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. डॉ. विजयकुमार गावित यांचे लहान बंधू शरद गावित यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळं नवापूर मतदारसंघात पुन्हा तिरंगी लढत होत असल्याचे चित्र आहे.
शरद गावित हे 2009 मध्ये नवापूर मधून आमदारही झाले. तेव्हापासूनच शरद गावित या मतदारंसघात अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करीत आहेत. भरत गावित आणि शरद गावित यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसचे शिरीष कुमार नाईक यांचे टेन्शन वाढले आहे. मतदार नेमका कोणाचा बाजूने कौल देतात, याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.