Pune News: राजकीय नेत्यांकडे अनेक जण आपली तक्रार घेऊन येतात. राजकीय नेते मंडळी देखील नागरिकांच्या गाऱ्हाणे ऐकून आपापल्या परीने ती सोडवण्याचा प्रयत्न करतात अथवा आश्वासन देतात. काही वेळा मात्र नागरिकांच्या मागण्या या अजब असतात त्यामुळे त्याबाबत नेमकी कोणती भूमिका घ्यावी याबाबत राजकीय नेत्यांची पंचाईत होताना दिसते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आज पुणे दौऱ्यावर आहेत. यानिमित्ताने त्यांच्या अनेक बैठका आणि कार्यक्रम आहेत. याच कार्यक्रमाच्या दरम्यान एक पुणेरी आजीबाई धावत धावत सुप्रियाताई यांच्या जवळ पोहोचल्या. आजीबाईंनी सुप्रिया सुळेंकडे आपली तक्रार मांडली.
या आजीबाई आपल्याकडे येत आहेत हे पाहून सुप्रियाताईंनीही देखील त्यांना हसून प्रतिसाद दिला. त्यानंतर आजीबाई म्हणाल्या, "आम्ही पैसे भरून केबलचे चैनल घेतो मात्र त्या टीव्हीवर फक्त दहा मिनिटात कार्यक्रम दाखवतात आणि वीस मिनिटं नुसत्याच जाहिरात दाखवतात मग नेमकं आम्ही काय बघायचं," असा सवाल आजींनी उपस्थित केला.
"याबाबत कुठे तक्रार करावी, हे मला सुचतच नाही, योगायोगाने तुम्ही आलात त्यामुळे तुमच्याकडे ही गोष्ट सांगितली," जर तुम्हाला याबाबत काही करता आलं तर आमच्यावर मेहरबानी होईल. या जाहिरातीमुळे आमचा वेळ वाया जातो आणि या जाहिरातींचा आम्हाला वैताग आणला आहे," असे त्या आजीबाई म्हणाल्या.
आजीबाईंची व्यथा क्षणभर ऐकून सुप्रिया सुळे यांना देखील हसू आले, पण आजीबाई काही थांबल्या नाहीत. त्या म्हणाल्या, 'पंधरा मिनिटांचा तर कार्यक्रम असतो आणि त्याच्यामध्ये इतक्या साऱ्या जाहिराती दाखवतात, त्यावर सुप्रिया सुळे यांनी 22 मिनिटांचा एक एपिसोड असतो ना असा सवाल केला त्यावर आजीबाई म्हणाल्या नाही नाही थोडेच दाखवतात ते आणि मेहरबानी करून तुम्ही काहीतरी यावर करा, त्यावर सुप्रिया सुळे यांनी देखील होकारात्मक प्रतिसाद देत नक्की काहीतरी करू असा आश्वासन आजीबाईंना दिलं.
या संभाषणांना दरम्यान आजूबाजूच्या लोकांनी देखील आजी काय मागणी करत आहेत हे ऐकण्यासाठी गर्दी केली, मात्र आजीबाईंच्या मागणीमुळे आपसूकच सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.