Kartiki Ekadashi: शिंदे की अजितदादा? महापूजा कोण करणार? मंदीर समितीच्या बैठकीत काय ठरलं...

Who will perform Kartiki Ekadashi Mahapuja: विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने राज्य सरकारकडे या संदर्भात स्पष्टीकरण मागवले आहे. कार्तिकी एकादशीच्या पारंपरिक महापूजेचा मान नेमका कोणाला द्यायचा, यावर समितीला स्पष्टता नसल्याने त्यांनी निर्णय विधी विभागाकडे सोपवला आहे.
Kartiki Ekadashi news
Kartiki Ekadashi newsSarkarnama
Published on
Updated on

Pandharpur: कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर यंदा पंढरपूरमध्ये महापूजा कोण करणार यावरून मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे की उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांच्या नावांची चर्चा सुरू आहे. पंढरपुरात विठ्ठल मंदिर समितीची याबाबत बैठक झाली. यात यंदाच्या कार्तिकी महापूजेचा मान कोणाला द्यायचा, यावरुन पेच निर्माण झाला आहे. मंदीर समितीने राज्याच्या विधीविभागाकडे धाव घेतली आहे.

विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने राज्य सरकारकडे या संदर्भात स्पष्टीकरण मागवले आहे. कार्तिकी एकादशीच्या पारंपरिक महापूजेचा मान नेमका कोणाला द्यायचा, यावर समितीला स्पष्टता नसल्याने त्यांनी निर्णय विधी विभागाकडे सोपवला आहे.

परंपरेनुसार, दरवर्षी आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा केली जाते. तर कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्री किंवा वरिष्ठ मंत्री विठ्ठलाची महापूजा करतात. यंदा महायुतीतील दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपैकीकोणाला मान मिळतो, यावर चर्चा सुरु आहे.

राज्यातील राजकीय समीकरणे पाहता हा विषय केवळ धार्मिक नव्हे तर राजकीय दृष्ट्याही संवेदनशील बनला आहे. विधी विभागाकडून येणाऱ्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. पंढरीतील विठ्ठल मंदिर समितीची बैठक सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली. बैठकीत कार्तिकी एकादशीच्या तयारीसोबतच पूजेच्या मानाच्या विषयावरही सविस्तर चर्चा झाली.

Kartiki Ekadashi news
Anandacha Shidha Scheme: दिवाळीतील 'ही' योजना निघाली 'फुसका बार'; गरिबांच्या आनंदावर विरजण

बैठकीला शकुंतलाताई नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर, ॲड. माधवी निगडे, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत तसेच पुरातत्त्व विभागाचे डॉ. विलास वाहणे, कार्यकारी अभियंता श्रीनिवास गुजरे, वास्तुविशारद तेजस्विनी आफळे आणि ठेकेदार उपस्थित होते.

मंदिर समितीच्या बैठकीत काय निर्णय झाले?

  1. प्रस्तावित पंढरपूर विकास आराखड्यात मुखदर्शनरांग, अन्नछत्र आणि अन्य सुविधा उभारण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव देण्याचे ठरले.

  2. कम्युनिटी रेडिओ केंद्र स्थापन करण्यासाठी चार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव मंजूर

  3. मंदिर जतन व संवर्धनाबाबत विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र बैठक घेण्याचे ठरले.

  4. एमटीडीसी भक्तनिवासाचा करारनामा वाढवण्याचे निर्णय

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com