Supriya Sule, Aryan Khan sarkarnama
पुणे

आर्यनबाबत सुळे म्हणाल्या, ''जे घडलं ते आई म्हणून वाईट वाटतं..''

खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पहिल्यांदाच या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ''आर्यन खान (Aryan Khan) बाबत मीडिया ट्रायल व्हायला नको होती,' असे त्या म्हणाल्या.

सागर आव्हाड

पुणे : ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान याची काल जामिनावर मुक्तता झाली. २६ दिवसानंतर ऑर्थर रोड कारागृहातील मुक्कामानंतर तो घरी परतला आहे. त्याच्यावरील कारावाईवरुन राजकारण पेटलं आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या आरोपावर भाजपच्या काही नेत्यांनी मलिकांवरही आरोपाचे खंडन केले आहेत.

राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पहिल्यांदाच या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ''आर्यन खान (Aryan Khan) बाबत मीडिया ट्रायल व्हायला नको होती,' असे त्या म्हणाल्या. ''आर्यन खान बाबत जे घडलं आई म्हणून वाईट वाटत,'' असे सुळे म्हणाल्या. जांभुळवाडी येथील रोजगार मेळाव्यात त्या बोलत होत्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, ''आर्यन खानकडे काहीच सापडले नाही, त्याला २६ दिवस कोठडी देण्यात आली. हा कुठला न्याय ? समाजाने याचा विचार करण्याची गरज आहे. याबाबत केंद्राला जाब विचारला पाहिजे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी केलेले आरोप खरेच आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी पक्ष नवाब मलिक यांच्या पाठिशी आहे.

पुण्याचा महापैार राष्ट्रवादीचाच होणार..

''पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिवाळीच्या आठ दिवसासाठी सिलेंडरचा भाव 1 हजारावरून 500 रुपये कमी करुन महिलांना भाऊबीज द्यावी,'' असे सुळे म्हणाल्या. मोदी सरकारने सरकारी तपास यंत्रणांचा गैरवापर करीत विरोधकांवर छापा टाकण्याचा नवा रेकॉर्ड केला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर तब्बल सात वेळा छापे टाकले, काही मिळत नाही तरीही छापे टाकत आहेत. ''पुणे महापालिका निवडणुकीच्या आघाडीबाबत तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील. पुण्यात राष्ट्रवादी कॉग्रेसचा महापैार होणार,'' असे सुळे यांनी स्पष्ट केले.

आर्यनच्या अटकेनंतर बॉलीवुडमधील काही कलाकार शाहरुख खान, आर्यन खान (aryan khan) यांच्या समर्थनासाठी पुढे आले. तर काहींनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली नाही. अभिनेता शत्रुघ्न सिन्हा (shatrughan sinha) यांनी शाहरुख खानला टोमणा लगावला आहे. शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, ''माझी तीन मुलं सोनाक्षी, लव आणि कुश हे ड्रग्ज घेत नाहीत याचा मला आनंद आहे. सेलिब्रिटींसाठी त्यांच्या मुलांना योग्य दिशा दाखवणे आव्हानात्मक असते. मी सुरुवातीपासून विश्वास ठेवतो, मी उपदेश करतो आणि आचरण करतो. मी तंबाखूविरोधी अभियान करतो. मी नेहमी ड्रग्जला नाही म्हणतो.'' एनडीटीव्हीला मुलाखत देतांना शत्रुघ्न सिन्हा यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT