MPSC PSI topper Ashwini Baburao Kedari, aged 30, dies after a tragic accident. Despite treatment, she could not survive; Maharashtra mourns the loss of a young achiever. Sarkarnama
पुणे

MPSC Topper Ashwini Kedari : 2023 च्या MPSC टॉपरचे 30 व्या वर्षी निधन : IAS होण्याचे स्वप्न अधुरे

MPSC Topper Ashwini Kedari : एमपीएससी पीएसआय परीक्षेतील टॉपर अश्विनी बाबुराव केदारी यांचे वयाच्या ३० व्या वर्षी निधन झाले. अपघातानंतर उपचार सुरू होते, मात्र त्यांची प्राणज्योत मालवली. महाराष्ट्रासाठी ही मोठी हानी आहे.

Hrishikesh Nalagune

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेच्या टॉपर अश्विनी बाबुराव केदारी यांचे निधन झाले. वयाच्या 30 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. काही दिवसांपूर्वी घरीच त्यांचा मोठा अपघात झाला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण अपघातानंतर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.

अश्विनी बाबुराव केदारी या मुळच्या खेड तालुक्यातील पाळू गावच्या रहिवासी होत्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2023 मध्ये घेतलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत त्या राज्यात मुलींमधून प्रथम आल्या होत्या. एका सामान्य शेतकरी कुटुंबातील केदारी यांनी जिद्द, चिकाटीच्या जोरावर हे यश मिळविले होते.

पण एवढ्यावरच न थांबता केदारी यांचे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून IAS होण्याचे स्वप्न होते. या स्वप्नाचा पाठलाग करत त्यांचा अभ्यास सुरू होता. 28 ऑगस्ट रोजीही नेहमीप्रमाणे त्या पहाटे अभ्यासासाठी उठल्या होत्या. अंघोळीसाठी पाणी तापले का? हे बघण्यासाठी गेल्या असता त्यांना बाथरूममध्ये हिटरचा झटका बसला आणि उकळलेले पाणी अंगावर सांडले.

या अपघातात केदारी 80 टक्के भाजल्या होत्या. गंभीर अवस्थेत त्यांना पिंपरी-चिंचवड इथल्या डी.वाय. पाटील रुग्णालयात दाखल केले होते. तेव्हापासून त्या मृत्यूशी झुंज देत होत्या. उपचाराचा खर्च जास्त असल्याने त्यांच्या कुटुंबियांनी आणि खेड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांकडून मदतीचे आवाहन केले होते. अनेकांनी आर्थिक मदतीचा हात पुढे केला होता. पण अखेर त्यांचे निधन झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT