MPSC Exam Result :महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब मुख्य परीक्षा २०२० ही एकूण ६५० पोलिस उपनिरीक्षक पदांसाठी घेण्यात आली. या पदाच्या शारीरिक चाचणी व मुलाखत कार्यक्रम निश्चित झाल्यानंतर त्याबाबत माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ११ सप्टेंबर आणि २५ सप्टेंबर २०२२ या दिवशी पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी घेतलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२० मधून शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.या पदाकरिता मुख्य परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या नावाची यादी आणि गुणांची सीमारेषा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
निकालात पात्र न ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी गुणपत्रके प्रोफाइलवर पाठविल्याच्या दिवसांपासून दहा दिवसांत आयोगाकडे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून करता येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
आयोगाने महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२१ मधील सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक यांसह महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२१ मधील राज्य उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक या पदांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आणि तात्पुरती निवड यादी संकेतस्थळावर जाहीर केली आहे.
त्याआधारे उमेदवारांकडून भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (ऑप्टींग आउट) पर्याय मागविण्यात येत आहे. तात्पुरती निवड यादी व सर्वसाधारण गुणवत्ता यादी निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाच्या असून उमेदवारांच्या अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी पडताळणीनंतर काही बदल होऊ शकतो.
आज वेबलिंक सुरु..
परीक्षेच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय सादर करण्यासाठी आयोगाच्या ‘https://mpsc.gov.in’ या संकेतस्थळवरील ‘ऑनलाइन फॅसिलिटिज्’मध्ये ‘पोस्ट प्रेफरन्स/ऑप्टिंग आउट वेबलिंक उपलब्ध करून दिली आहे. ही वेबलिंक १९ नोव्हेंबर दुपारी बारा वाजल्यापासून ते २५ नोव्हेंबर रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याच्या पर्यायाआधारे अंतिम निकाल जाहीर करण्यात येईल, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.