ACB NEWS : कैद्याकडून ५० हजारांची लाच मागणारे दोन पोलीस एसीबीच्या जाळ्यात

ACB NEWS : कारागृहात कैद्यांसाठी उपाहारगृह आहे. उपाहारगृहातील कर्मचारी महिलेकडे लाचेची रक्कम देण्यास पाटील यांनी सांगितले.
 ACB NEWS :
ACB NEWS :sarkarnama

ACB NEWS : येरवडा कारागृहातील हवालदारासह एका महिलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ताब्यात घेतले आहे.या दोघांवर संचित रजेवर (पॅरोल) असलेल्या कैद्याकडून ५० हजारांची लाच मागितल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

याप्रकरणी एका कैद्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदार कैद्यास शिक्षा झालेली आहे. त्याला संचित रजा मंजूर करण्यात आली असून सध्या तो कारागृहाबाहेर आहे. खुल्या कारागृहात कैदी शिक्षा भोगत आहे.

 ACB NEWS :
Rahul Gandhi vs Savarkar : राहुल गांधींच्या विरोधात शिंदे गट आक्रमक, दुसरी तक्रार दाखल

हवालदार बाजीराव जोतीबा पाटील (वय ५४) याच्यासह ४८ वर्षीय महिले विरोधात येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार बाजीराव पाटील यांनी कैद्याला ५० हजार रुपयांची लाच मागितली. लाच न दिल्यास खुल्या कारागृहातून मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात येईल तसेच गैरवर्तणुकीचा अहवाल कारागृह प्रशासनास पाठविण्यात येईल, असे सांगितले. त्यानंतर पाटील यांनी कैद्याकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली.

तडजोडीअंती कैद्याने १५ हजारांची लाच देण्याचे मान्य केले. कारागृहात कैद्यांसाठी उपाहारगृह आहे. उपाहारगृहातील कर्मचारी महिलेकडे लाचेची रक्कम देण्यास पाटील यांनी सांगितले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून पाटील व महिलेस ताब्यात घेतले. पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त श्रीहरी पाटील आणि पथकाने ही कारवाई केली. पोलीस उपअधीक्षक शीतल घोगरे तपास करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com