MPSC students protest latest update : मागील काही दिवसांपासून पुणे शहरातील एस एम जोशी पूल परिसरात बसून एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. विरोधी पक्षातील नेते देखील या आंदोलनाला भेट देत आहेत. दरम्यान, या आंदोलनाबाबत पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे.
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तसेच नोटीस बजावून विद्यार्थ्यांना तातडीनं एस एम जोशी पूल परिसर रिकामा करण्यास सांगितले आहे.
विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या ठिकाणी आंदोलन करण्याची सुधारित परवानगी पुणे पोलिसांनी नाकारली आहे. दरम्यान, विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत. त्यामुळे पोलिस नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी ही एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांचा राजीनामा घेणे आहे. जोपर्यंत राजीनामा होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, असे सांगितले जात आहे. तर, विद्यार्थी आंदोलनाला आज, ७ ऑक्टोबर रोजी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन जाहीर पाठिंबा दर्शवला. विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्यांसाठी आगामी काळात तीव्र संघर्ष उभारण्याचा इशारा त्यांनी या वेळी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.