MPSC exam pattern : MPSC परीक्षेचा वस्तुनिष्ठ पॅटर्न, भरतीबाबत खुशखबर; आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

MPSC objective pattern, MPSC recruitment, Devendra Fadnavis MPSC : आज मंत्रिमंडळ बैठकीत पाच विभागांचे सादरीकरण झाले. प्रत्येक मंत्रिमंडळ बैठकीत पाच विभागांनी पदे किती, रिक्त किती आणि एमपीएससीला मागणी केली केली, याची माहिती देणे नियमित केले आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
CM Devendra Fadnavis on MPSC pattern
CM Devendra Fadnavis on MPSC patternSarkarnama
Published on
Updated on

MPSC latest update : ज्यातील भरती प्रक्रिया, परीक्षा पध्दत अधिक बळकट करण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. या टास्क फोर्सने शिफारस केल्यास MPSC च्या परीक्षा पुन्हा वस्तुनिष्ठ पॅटर्नने घेण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी जाहीर केले. तसेच राज्यात आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडणारी भरती एमपीएससीमार्फत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

MPSC तील सुधारणांबाबत सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, समितीचा थेट विद्यार्थ्यांशी संवाद आणि संबंधितांशी संवाद सुरू आहे. काही मागण्या सातत्याने येत आहे. त्यामध्ये राज्यसेवा, कृषि, एफएसओ, अभियांत्रिकी अशा विविध सेवांसह सर्व परीक्षांमध्ये पुन्हा एकदा वस्तुनिष्ठ पॅटर्न लागू करण्याची मागणी होत आहे.

दळवी समितीने वस्तुनिष्ठ पॅटर्नवरून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नकडे जाण्याचा अहवाल दिला होता. त्यावेळी तो अहवाल स्वीकारला होता. परंतू त्या निर्णयानंतर पुन्हा वस्तुनिष्ठ पॅटर्नची मागणी जोरकसपणे येत आहे. यासंदर्भात शासनाची भूमिका एवढीच आहे की, समितीने जर वस्तुनिष्ठ पॅटर्नची शिफारस केली किंवा अजून काही बदल सुचविले तर शासन ते बदल स्वीकारण्यास शासन सकारात्मक असेल, असे मुख्यमंत्र्‍यांनी स्पष्ट केले.

CM Devendra Fadnavis on MPSC pattern
Maharashtra drought news : महाराष्ट्रातील दुष्काळाबाबत सरकारचा मोठा निर्णय; मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितला 'प्लॅन'

एमपीएससीकडे खूप कमी पदे असतात. आज मंत्रिमंडळ बैठकीत पाच विभागांचे सादरीकरण झाले. प्रत्येक मंत्रिमंडळ बैठकीत पाच विभागांनी पदे किती, रिक्त किती आणि एमपीएससीला मागणी केली केली, याची माहिती देणे नियमित केले आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की, पुढील परीक्षेत आतापर्यंतचे विक्रम मोडणारी पदे आणू. आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडत त्यापेक्षा कितीतरी जास्त पदे पहिल्यांदाच एमपीएससीमध्ये नेणार आहोत, असे मुख्यमंत्र्‍यांनी जाहीर केले.

CM Devendra Fadnavis on MPSC pattern
Teacher transfer scam : बदलीसाठी दोन लाख दिले तर पसंतीची शाळा..! शिक्षकाने हायकोर्टातच ऐकवली ऑडिओ क्लिप, न्यायमूर्तीही अवाक...

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त पदेही भरण्यासदंर्भात एमपीएससी किंवा अन्य पर्यायी व्यवस्था करता येईल का, असाही विचार सुरू आहे. याबाबतही समितीशी आम्ही चर्चा करू. समितीचा रिपोर्ट आल्यानंतर यासंदर्भात अंतिम निर्णय आम्ही करणार आहोत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर भाष्य करताना त्यांनी आम्हाला राजकीय मागणीत रस नसल्याचे सांगितले. आमचा रस विद्यार्थ्यांच्या मागण्यांमध्ये आहे. त्यांची न्याय मागणी राज्य सरकार पूर्ण करेल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com