OCB reservation protest
OCB reservation protest Sarkarnama
पुणे

ओबीसी आंदोलनात राडा; वडेट्टीवारांच्या विरोधात घोषणाबाजी करणाऱ्याला चोप

सरकारनामा ब्युरो

पुणे: ओबीसी आरक्षणासाठी (OBC Reservation) कॉंग्रेसच्या (Congress) ओबीसी सेलकडून आज जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. ओबीसी आरक्षणाच्या मागणीसह समाजाच्या इतर मागण्यांसाठी केंद्र सरकारच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता. मात्र, पाहता पाहता या मोर्चाला हिंसक वळण लागले. मोर्चा सुरु असताना अचानक जोरदार राडा झाल्याचं पहायला मिळालं.

आंदोलन सुरू असताना ओबीसी कार्यकर्ते मृणाल ढोले पाटील आंदोलनाच्या स्थळी पोहचले. ले पाटील यांनी थेट काँग्रेस मंत्री विजय वड्डेटीवार यांच्याविरोधात घोषणाबाजी करत काळा झेंडा दाखवून निषेध व्यक्त केला. यावेळी संतापलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मृणाल ढोले पाटील यांना धक्काबुक्की करत मारहाण केली. ज्यामुळे बराच वेळ या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता.

ओबीसीना आरक्षण मिळण्यासाठी ढोले पाटील देखील लढा देत असल्यामुळे ते ही या मोर्चाच्या ठिकाणी आले. मात्र, अचानक त्यांनी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्यामुळे संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी ढोले पाटील यांना धक्काबुक्की करत मारहाण केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकच गोंधळ उडाला. मृणाल ढोले पाटील हा भाजपचा पदाधिकारी असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.

दरम्यान, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको. अशी भूमिका सातत्याने राज्यसराकरने मांडली आहे,पण सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला ट्रिपल टेस्ट करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आम्ही आम्ही ट्रिपल टेस्ट पुर्ण केल्या आहेत. यात कुठेही 50 टक्क्यांची मर्यादा आम्ही ओलांडली नसल्याचे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे नक्कीच कोर्ट देखील आम्हाला न्याय देईल, असे मत राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले आहे. याबाबत निवडणूक आयोगाने मागच्या निवडणूकीत न्यायालयाने ओबीसी जागा ओपन प्रवर्गासाठी खुल्या केल्या होत्या. तो आदेश बदलणे गरजेचं आहे. त्यामुळे कोर्टाने या सुनावणीत तो आदेश बदलण्यास सांगितले की आपोआपच आगामी निवडणुका ओबीसी आरक्षणासहित होतील, असेही यावेळी हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

दरम्यान, ओबीसींच्या जनसमुदायासोबत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर गेलेल्या महामोर्चाचे निवेदन आज जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना देण्यात आले. यावेळी ओबीसी आरक्षण आणि विविध मागण्यां संदर्भात जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याशी चर्चा करण्यात आली. यावेळी प्रदेश काँग्रेस ओबीसी अध्यक्ष भानुदासजी माळी, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष रामेशदादा बागवे, माजी आमदार मोहनजी जोशी, प्रदेश जनरल सेक्रेटरी अभयजी छाजेड, माजी आमदार दिप्तीताई चवधरी, पुणे शहर ओबीसी काँग्रेस अध्यक्ष प्रशांतजी सुरसे, माजी नगरसेवक राजेंद्रजी शिरसाठ आदी मान्यवर उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT