पराभूत उमेदवार १५ दिवसांसाठी होणार नगरसेवक; शिवसेनेला लागली लॉटरी

Shivsena | Mumbai | BMC : पराभूत उमेदवार ४ वर्ष ११ महिने १५ दिवसांनी विजयी
BJP & ShivSena
BJP & ShivSena Sarkarnama

मुंबई : मुंबई महापालिकेची मुदत ७ मार्च रोजी संपत आहे. मात्र अद्याप याठिकाणी निवडणूक न लागल्याने त्यानंतर याठिकाणी प्रशासकांची नेमणूक होणार आहे. त्यामुळे आता सभागृहाची मुदत अवघी १५ दिवस राहिली आहे. पण या शेवटच्या दिवसांमध्ये देखील शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या वाढणार आहे. शिवसेनेचे सध्या महापालिकेत ९६ नगरसेवक आहेत. मात्र ही संख्या आता ९६ वरून ९७ होणार आहे. अवघ्या १५ दिवसांसाठी शिवसेनेचा पराभूत उमेदवार नगरसेवक होणार आहे.

Prakash More
Prakash MoreBjp

२०१७ मध्ये प्रभाग क्रमांक १५९ मधून भाजपचे प्रकाश मोरे निवडून आले होते. तर शिवसेनेच्या कोमल जामसांडेकर यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती. दरम्यान प्रकाश मोरे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याची तक्रार कोमल यांनी केली होती. त्यानंतर हा खटला न्यायालयात दाखल करण्यात आला होता. यावर आता निर्णय देताना लघुवाद न्यायालयाने निवडून आलेले भाजप नगरसेवक प्रकाश मोरे यांचं नगरसेवक पद रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

Komal Jamkhandekar
Komal JamkhandekarSarkarnama

याशिवाय दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवणाऱ्या उमदेवराला म्हणजेच कोमल जामसांडेकर यांना नगरसेवक पद देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. सध्या मोरे यांच्या वकिलाने या आदेशाविरोधात वेळ मागून घेतली आहे. मात्र न्यायलयाने या निर्णयाला स्थगिती न दिल्याने मोरे यांचे पद रद्द होवून कोमल यांना अवघ्या काही दिवसांसाठी नगरसेवक पदाचा कालावधी मिळणार आहे. ७ मार्चनंतर सभागृहाचा कार्यकाळ संपून पालिकेवर प्रशासक नेमला जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com