Mukesh Ambani and Sachin Waze : उद्योगपती मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा जिवे मारण्याची धमकी आली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने मुकेश अंबानी यांच्याकडे २० कोटी रुपयांची खंडणी मागितली असून, पैसे दिले नाहीत तर अंबानी यांना ठार मारण्याची धमकी दिली आहे. एका अज्ञात व्यक्तीने मुकेश अंबानी यांना धमकीचा ई मेल पाठवला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या पूर्वीही ५ ऑक्टोबर २०२२ रोजी मुकेश अंबानी यांना लँडलाइन क्रमांकावरून एका अज्ञात व्यक्तीने फोन करून अशाप्रकारची धमकी दिली होती. त्यापूर्वी २५ फेब्रुवारी २०२१ रोजी, बनावट परवाना प्लेट्स आणि सुमारे २० स्फोटक जिलेटिन स्टिक्स असलेली एका महिंद्रा स्कॉर्पिओ एसयूव्ही मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाच्या बाहेर आढळली होती, यामुळे एकच खळबळ उडाली होती.
पुढे या प्रकरणात पोलिसांनी तपासादरम्यान अनेक जणांना अटक केली. विशेष म्हणजे अँटिलिया बाहेर स्फोटकं ठेवल्याप्रकरणी आणि मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी तत्कालीन पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास संस्थेच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते. त्यामुळे पुन्हा एकदा सचिन वाझेंचे नाव चांगलेच चर्चेत आले होते.
त्यात आता पुन्हा एकदा अंबानींना जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे, तर २९ सप्टेंबर २०२३ रोजी सचिन वाझेंना २०२१मध्ये दाखल करण्यात आलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात विशेष सीबीआय न्यायालयाने जामीन मंजूर होता. मात्र, अन्य काही प्रकरणांचा तपास सुरू आहे. काही केसेसचा तपास NIA तर काहींचा CBI करत असल्याने वाझेंचा मुक्काम तुरुंगातच आहे.
सचिन वाझेंची ओळख "एन्काउंटर स्पेशालिस्ट" अशीच आहे. मुंबई एन्काउंटर स्क्वॉडमध्ये ते "एन्काउंटर स्पेशालिस्ट" होते. तब्बल ६३ कथित गुन्हेगारांच्या मृत्यूमध्ये सहभाग होता. परंतु चकमकीत ते कधीही जखमी झाले नाहीत. ख्वाजा युनूसच्या कोठडीतील मृत्यूप्रकरणी अटक झाल्यानंतर त्यांना १७ वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते, परंतु नंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आणि त्यानंतर जून २०१७ मध्ये त्यांना पुन्हा कामावर घेण्यात आले.
रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेत त्यांनी रायगड पोलिस पथकाचे नेतृत्व केले. मार्च २०२१ मध्ये, त्यांना अँटिलिया स्फोटकं प्रकरणातील भूमिका व सहभागासाठी पुन्हा अटक करण्यात आल आणि ११ मे २०२१ रोजी पोलिस पदावरून बडतर्फ करण्यात आले होते.
काहीकाळ क्राईम इंटेलिजन्स युनिट या प्रमुख पदावर सचिन वाझे यांना नियुक्त करण्यात आले. या पदावर रुजू होताच अन्वय नाईक या आत्महत्या प्रकरणाची झाडाझडती सुरू केली. त्यानंतर टीआरपी घोटाळाप्रकरणी अर्णव गोस्वामी यांना घरात अटक केली. दिलीप छाबळे यांच्या स्पोर्ट्स कार्ड घोटाळा प्रकरणाचा उलगडा केला. वाझे यांची धडाकेबाज कारवाई सुरू असतानाच स्फोटकांनी भरलेल्या कारचे प्रकरण समोर आले आणि वाझेंना अटक झाली.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मुंबई पोलिस आयुक्त पदावरून हटवण्यात आल्यानंतर परमबीर सिंग यांनी खळबळजनक आरोप केला होता. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या मागणीनुसार मुंबईतील व्यावसायिकांडून दरमहा १०० कोटी रुपये गोळा करण्याच्या योजनेत वाझे यांचा सहभाग होता, असा आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. त्यामुळे या आरोपावरून जोरदार चर्चा झाली होती. मात्र, चौकशीनंतर या आरोपात काय तथ्य नसल्याचे पुढे आले आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.