Sanjay Raut On Devendra Fadnavis : शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, भाजपकडून ट्विट केल्या गेलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'मी पुन्हा येईन' हा व्हिडिओबाबत राऊत यांनी सूचक वक्तव्य करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही जोरदार प्रहार केला आहे. यामुळे आता ठाकरेंची शिवसेना-भाजपच्या मनोमिलनासाठी असे वक्तव्य केले का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. (Latest Marathi News)
संजय राऊत म्हणाले, 'मी पुन्हा येईनचं' मी स्वागत करतो. कारण ते किमान कायदेशीर सरकार आणि कायदेशीर मुख्यमंत्री असतील. आम्ही कायदा आणि घटना मानणारे लोक आहोत. पुन्हा येईनवाले कायदेशीर मार्गाने येणार असतील, तर आम्ही त्यांचं स्वागत करू, असे म्हणत त्यांनी शिवसेना-भाजपच्या चर्चेची दारे खुली केली का? अशा चर्चांना उधाण येत आहे.
राऊत म्हणाले, "या राज्यात बेकायदेशीर मुख्यमंत्री बसलेले आहेत. आणि तो महाराष्ट्राला लुटत आहे. त्यांचे बेकायदेशीर आदेश पोलिस आणि यंत्रणा पाळत आहे. हे अत्यंत चुकीचं आहे. अशावेळी अशा घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना घालवून, एक तात्पुरती व्यवस्था म्हणून कायदेशीर सरकार येणार असेल तर त्यांचं आम्ही फडणवीसांचं स्वागत करू, असेही सूचकपणे राऊत म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.