Mantralay Mumbai. Sarkarnama
पुणे

Municipal Corporations : महापालिकांची नव्याने होणार प्रभाग रचना; चार सदस्यांचा प्रभाग!

Municipal Corporations : मुंबईसह राज्यातील २४ महानगरपालिका निवडणुकीसाठी नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश नगरविकास विभागाने मंगळवारी काढले.

सरकारनामा ब्यूरो

Municipal Corporations : मुंबई महापालिकेसह राज्यातील २४ महापालिकांच्या निवडणुका घेण्यासाठी या सर्व महापालिकांची प्रभाग रचना नव्याने करण्याची आदेश राज्य सरकारने आज काढले. निवडणुका विविध न्यायालयीन प्रकरणांमध्ये रखडलेल्या असताना राज्य सरकारने महापालिकांची नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश काढले आहेत. या निर्णयामुळे महापालिकांच्या निवडणुका आणखी लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात पुढील आठवड्यात सुनावणी होणार असतानाच आधीच्या महाविकास आघाडीने सरकारने तयार केलेली प्रभाग रचना नव्याने बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईसह (BMC) राज्यातील २४ महानगरपालिका निवडणुकीसाठी नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश नगरविकास विभागाने मंगळवारी काढले. मुदत संपलेल्या व नजीकच्या कालावधीत मुदत संपत असलेल्या महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकीसाठी शेवटच्या जनगणनेनुसार प्रभागातील सदस्यांची संख्या आणि रचना निश्चित करून प्रभाग रचनेचे प्रारुप तयार करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तत्काळ सुरु करण्यात यावी, अशा सूचना नगरविकास विभागाने संबंधित महापालिका आयुक्तांना दिल्या आहेत.

राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर राज्य सरकारने महाविकास आघाडी सरकारने (MVA) लोकसंख्या वाढीच्या आधारावर सरासरी प्रभाग संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला होता. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहेत. यातच नवीन मुंबई, औरंगाबादच्या निवडणूक दोन वर्षापेक्षा अधिक काळापासून, तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही फेब्रुवारीपासून प्रलंबित आहे. यातच अनेक ठिकाणी प्रशासक हे पालिकेचे कामकाज सांभाळत आहेत. पालिका निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असतानाच नगरविकास विभागाने हा निर्णय घेतला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT