PCMC Commissioner Rajesh Patil
PCMC Commissioner Rajesh Patil  Sarkarnama
पुणे

आता नगरसेवकांची कामे करणार पालिकेचे अधिकारी; असे चालणार कामकाज...

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची (PCMC) मुदत रविवारी (ता.१३ मार्च) संपली. त्यामुळे कालपासून (ता. १४ मार्च) शहरात प्रशासकीय राजवट तथा पालिका आयुक्त राजेश पाटील (PCMC Commissioner Rajesh Patil) यांचा प्रशासक म्हणून कारभार सुरु झाला. दरम्यान, परवापर्यंत नगरसेवक आपापल्या प्रभागातील तक्रारींची तड लावत होते. आता प्रशासकीय राजवटीत हे काम पालिका अधिकारी करणार आहेत. त्यासाठी दर आठवड्याच्या सोमवारी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत पालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयात ते जनसंवाद सभा घेणार आहेत. त्यात नागरिकांची गाऱ्हाणी ऐकून त्यावर मार्ग काढला जाणार आहे.

आयुक्त पाटील यांनी काल प्रशासक म्हणून सूत्रे हाती घेताच पहिलाच निर्णय जनसंवाद सभेचा घेतला. तिच्या आय़ोजनाची जबाबदारी पालिकेचे सह शहर अभियंता, सहाय्यक आयुक्त, उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यांना यासाठी मुख्य समन्वय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. महापालिकेचे तिन्ही अतिरिक्त आयुक्त आणि प्रशासक आयुक्तही या सभेला उपस्थित राहणार आहेत. तीत आयुक्त कार्यालयाशी सबंधित तक्रारीवर अतिरिक्त आय़ुक्त (एक) दर मंगळवारी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत बैठक घेतील. तेथे तड न लागलेल्या तक्रारींवर प्रशासक स्वत दर शुक्रवारी विभागप्रमुखांची बैठक घेऊन त्या सोडविणार आहेत. त्यामुळे नगरसेवक असतानाही त्यांच्या पातळीवर क्षेत्रीय कार्यालयामार्फत होणारी जनतेची कामे ही आता पालिका अधिकारी करणार आहेत. तसेच प्रशासकांनी गत आठवड्यात घेतलेले निर्णय, पालिका आणि सरकारच्या योजना व महत्वाच्या परिपत्रकांची माहितीही जनसंवाद सभेत दिली जाणार आहे.

या सभेने वॉर्डसभेच्या आठवणी पुन्हा जागवल्या जाणार आहेत. नगरसेवकांची मुदत संपल्याने प्रशासन आणि नागरिकांतील सुसंवाद कायम ठेवून त्यांच्या तक्रारींच्या जलद निवारणासाठीतसेच प्रशासकीय निर्णय आणि विकासकामांत जनतेच्या आशा आकांक्षेचे प्रतिबिंब उमटणे गरजेचे असल्याने जनसंवाद सभेचे आय़ोजन करण्यात येत असल्याचे आय़ुक्तांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT