Pune News : पुणे लोकसभा निवडणुकीमध्ये आता तिरंगी लढत होणार आहे. महायुती महाविकास आघाडीबरोबर वंचित बहुजन आघाडीनेदेखील वसंत मोरे यांना उमेदवारी दिल्याने पुण्यातील लढतीमध्ये रंगत आली आहे.
मात्र, वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यामागे मुरलीधर मोहोळ यांना विजयी करण्याचे षडयंत्र तर नाही ना, असा संशय जितेंद्र आव्हाड यांनी बोलून दाखवला होता. यामुळे पुण्यातील राजकीय वर्तुळात तर्कविर्तकांना उधाण आले आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या या विधानावर वसंत मोरे यांच्यासह महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनीदेखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या काल पुण्यामध्ये विविध बैठका झाल्या. या बैठकांना जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. त्यांनी या वेळी मध्यमांशी संवाद साधताना त्यांच्या उमेदवारीवरून टीकास्त्र सोडले. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी वसंत मोरे यांच्यामध्ये असे कोणते संविधानातले गुण बघितले? संविधानासाठी लढताना त्यांना कुठे बघितले? ते कुठल्या आंदोलनात आघाडीवरती होते? कुठल्या दलितांच्या मदतीसाठी ते गेले होते.? असे अनेक प्रश्न आव्हाडांनी उपस्थित केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
वसंत मोरेंना दिलेली उमेदवारी हे गणितच आपल्याला कळत नसल्याचं सांगत वसंत मोरे यांना महाविकास (Maha Vikas) आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या मतांचं विभाजन करण्यासाठी उभं केलंय का? असा सवालही आव्हाडांनी या वेळी उपस्थित केला. तसेच वसंत मोरेंना उमेदवारी देऊन महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची मुरली वाजवायची तर नाही ना? असा संशयही आव्हाडांनी व्यक्त केला.
जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर पतिक्रिया देताना मोरे म्हणाले, वसंत मोरे काय आहे हे समजण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांना पुण्यात यावे लागेल.आव्हाड यांनी माझं काम पाहण्यासाठी माझ्या वॉर्डमध्ये यावं . मी आव्हाड यांना माझ्या वॉर्डची सहल मी करून देतो. आणि राहिला प्रश्न लोकसभा निवडणुकीचा तर निवडणुकीमध्ये मी मुरलीची मुरली वाजवतो की, आव्हाडांची पुंगी हे कळेलच, अशी खोचक टीकादेखील मोरे यांनी केली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया देताना मोहोळ म्हणाले, जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या मोठ्या नेत्यावरती मी बोलत नाही. मी एक छोटा कार्यकर्ता आहे. मात्र, पुणे शहरात जितेंद्र आव्हाड यांना कोण ओळखतं आणि त्यांच्या बोलण्याला कोण महत्त्व देतं? आम्ही जितेंद्र आव्हाड ओळखतच नाही , अशी प्रतिक्रिया मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
(Edited By : Chaitanya Machale)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.