Murlidhar Mohol, Ravindra Dhangekar Sarkarnama
पुणे

Pune Politics News : धंगेकरांच्या आंदोलनाचा व्हिडिओ ट्विट करत मोहोळांनी हवाच काढली

Murlidhar Mohol Slams Ravindra Dhangekar : पालिका कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करतानाचा रविंद्र धंगेकरांचा व्हिडिओ व्हायरल...

Sudesh Mitkar

Ravindra Dhangekar On PMC Officer Pune News :

पुण्यातील एका पाण्याच्या टाकीचे उद्घाटन करण्यावरून काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदारासह संपूर्ण भाजपलाच आव्हान दिले. या टाकीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होण्यापूर्वीच धंगेकर यांनी नारळ फोडण्याचा प्रयत्न केला.

धंगेकरांनी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांसह शक्तिप्रदर्शन करत भाजपला एक प्रकारे चॅलेंज करण्याचाच प्रयत्न केला. धंगेकर आणि काँग्रेस नेत्यांनी केलेल्या या आंदोलनाची प्रचंड चर्चा काल पुण्याच्या राजकीय वर्तुळात झाली. यानंतर काही तासांतच माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी एक व्हिडिओ ट्विट करत आंदोलनाची हवाच काढून घेतली.

शुक्रवारी झालेल्या काँग्रेसच्या आंदोलनादरम्यान धंगेकर यांनी (PMC ) महापालिकेच्या एका अधिकाऱ्याला शिवीगाळ केली. मुरलीधर मोहोळ यांनी ही घटना पुणेकरांसमोर उघड करत धंगेकारांच्या वागण्यावर सवाल केला. आता पाण्याच्या टाकीवरून सुरू झालेला हा वाद पुढील काळामध्ये वाढण्याची शक्यता आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये धंगेकर आणि मोहोळ एकमेकांसमोर ठाकण्याची शक्यता असल्याने या वादाला आता राजकीय किनार येणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील काळामध्ये आणखी गडद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शनिवारी सकाळी मुरलीधर मोहोळ यांनी एक्स या प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर करत सुसंस्कृत कसब्याचे काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर महापालिका अधिकाऱ्यांना शिव्या देत आहेत, असे म्हटले आहे. ही मस्ती आली कुठून? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

तसेच यांचे नेते दिवसरात्र 'मोहब्बत की दुकान' म्हणून तोंडच्या वाफा टाकता. पण या 'मोहब्बत की दुकान' चा हाच खरा चेहरा आहे, जो धंगेकरांनी सर्वांसमोर दाखवला, असा हल्लाबोल मोहोळ यांनी धंगेकरांवर केला.

अवघ्या वर्षभराच्या आतच आमदारकीची हवा धंगेकरांच्या डोक्यात गेली. पण हा मस्तवालपणा पुणेकर लवकरच उतरवतील, असेही मोहोळ यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

edited by sachin fulpagare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT