Ravindra dhangekar : आमदार धंगेकरांचा गंभीर आरोप; पोलिस भाजपचे कार्यकर्ते, आमदाराने कानाखाली मारलेली...

Political News : टाकीच्या उद्घाटनावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई रंगली आहे.
 Ravindra Dhangekar
Ravindra DhangekarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : महापालिकेने गोखलेनगर, जनवाडी या प्रभाग क्रमांक 11 ब मध्ये असलेल्या आशानगर भागात 20 लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारली आहे. या टाकीच्या उद्घाटनावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई रंगली आहे.

स्थानिक आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या टाकीचे उद्घाटन ठेवले होते. याला विरोध करीत काँग्रेसने अजित पवार येण्यापूर्वीच उद्घाटन करण्याचा निर्णय घेतला. टाकीचे उद्घाटन करण्यास गेलेल्या काँग्रेस कार्यकर्ते आमदार आणि पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून धक्काबुक्की झाली. मोठ्या प्रमाणात वाद झाला.

यानंतर शनिवारी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह महाविकास आघाडीतील स्थानिक नेत्यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेत संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली. यानंतर धंगेकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला

 Ravindra Dhangekar
Delhi Politics : दिल्लीत 'ऑपरेशन लोटस?' आपच्या आमदारांना 25 कोटी अन् भाजप तिकीटाची ऑफर?

रवींद्र धंगेकर म्हणाले, काँग्रेसचे माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांनी त्यांच्या नगरसेवक निधीतून प्रभागामध्ये टाकीची उभारणी केली आहे. त्या टाकीचे काम आता पूर्ण झाले आहे. मात्र, या कामासाठी दत्ता बहिरट यांनी सातत्याने पाठपुरावा करून ते पूर्णत्वास नेले आहे. या कामाचे उद्घाटन होत असताना त्या उद्घाटनास या कामाचा पाठपुरावा करणारे आणि निधी उपलब्ध करून देणारे दत्ता बहिरट यांना सन्मानाने बोलवावं, अशी विनंती महापालिका आयुक्तांना भेटून केली होती.

मात्र तरीदेखील भाजपने हा कार्यक्रम हायजॅक करून रेटून नेण्याचा प्रकार केला. भाजपने यापूर्वीदेखील माझ्या प्रभागातील निधी पळून नेला आहे. याप्रकारे भाजपाकडून हुकूमशाहीचा राजकारण सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, काल महाविकास आघाडीकडून करण्यात येणाऱ्या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून अत्यंत निंदनीय प्रकार पाहायला मिळाला. पोलिसांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली. आज पुणे शहरामध्ये अनेक पोलिस अधिकारी हे भाजपचे पदाधिकारी असल्यासारखं वागत असल्याचा आरोप रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar)यांनी केला.

अधिवेशनामध्ये हक्कभंग प्रस्ताव आणणार

भाजप आमदार सुनील कांबळे (Sunil Kambale) यांनी पोलिसांना कानाखाली मारलेली चालते. मात्र, आम्ही हक्कासाठी आंदोलन केलं तर मात्र आम्हाला धक्काबुक्की केली जाते. अशा प्रकारची हुकूमशाही सध्या सुरू आहे. त्याचा निषेध आम्ही पोलिस आयुक्तांकडे नोंदवला आहे. शांततेच्या मार्गाने चाललेले आंदोलन अशा प्रकारे पोलिस दडपणार असतील तर या विरोधात अधिवेशनामध्ये हक्कभंग प्रस्ताव आणणार असल्याचं धंगेकर यांनी सांगितले.

(Edited by - Sachin Waghmare)

R...

 Ravindra Dhangekar
Ravindra Dhangekar : काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांना भाजपची ऑफर? ; 'या' नेत्याच्या विधानाने जोरदार चर्चा!

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com