Mumbai News : पुण्याचे पोलिस आयुक्त असताना तत्कालीन पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुणे पोलिस दलाची तीन एकरची जागा ही एका बिल्डरला हस्तांतर करा, असे दादांनी सांगितल्याचा उल्लेख त्यावेळच्या पुण्याच्या पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी आपल्या 'मॅडम कमिशनर' या येत्या बुधवारी प्रकाशित होणाऱ्या पुस्तकात पवारांचे नाव न घेता केला आहे. नंतर त्यांनी आज पत्रकार परिषद घेत, मात्र थेट पवारांचे नाव घेतले.
तसेच कॉंग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या (Nana Patole) बाबतीत घडले. त्यांनी प्रथम दुपारी हे मंत्री 'दादा'कोण ? हे जनतेला कळले पाहिजे, अशी प्रतिक्रिया दिली. नंतर बोरवणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन पवारांचे नाव घेताच पटोलेंनीही सायंकाळी पवारांचे नाव घेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
माजी आयपीएस अधिकारी बोरवणकर (Meeran Borwankar) यांनी पुण्यातील येरवड्याच्या सरकारी जागेसंदर्भात केलेले आरोप अत्यंत गंभीर असल्याने त्याची उच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायमूर्तीमार्फत चौकशी करावी आणि चौकशी होईपर्यंत पवारांना कार्यमुक्त करावे, अशी मागणी पटोलेंनी सायंकाळी केली. बोरवणकर यांनी येरवड्याची पोलिस विभागाची जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा तत्कालीन पालकमंत्र्यांचा प्रयत्न होता हा जो आरोप केला आहे, त्यावर सरकारला आम्ही अधिवेशनात जाब विचारणारच आहेत. पण, चौकशीची मागणी केली, तर सरकारच सरकारची चौकशी कशी करणार ? असे ते म्हणाले.
या प्रकरणात 'दाल में कुछ काला है' असे नाही, तर सर्व डाळच काळी आहे, असा घणाघात पटोलेंनी केला. पवारांनी त्यांच्या जवळचा बिल्डर शाहीद बलवा याला सरकारी जमीन द्यावी म्हणून आपल्यावर कसा दबाव आणला हे बोरवणकरांनी लिहिले होतेच. पण, आज त्यांनी प्रेस घेत त्यावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे या राज्य सरकारमध्ये, जर काही नैतिकता शिल्लक असेल, तर त्यांनी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तीमार्फतच या प्रकरणी चौकशी केली पाहिजे. तरच सर्व सत्य बाहेर येईल, असे पटोले म्हणाले.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.