Malegaon Sugar Factory News : मदननाना देवकातेंची नाराजी कायम; माळेगावच्या बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रमात काय घडलं ?

Baramati Politics : " पक्षाशी कायम एकनिष्ठ राहूनही पद दिले जात नाही, यातूनच...."
Madan Devkate
Madan Devkate Sarkarnama
Published on
Updated on

Baramati News : बारामती तालुक्यातील माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीला महिना होत आला आहे. असे असले तरी यावरून झालेल्या नाराजीनाट्यावर अद्यापही पडदा पडलेला दिसत नाही.अध्यक्षपदी अॅड. केशवराव जगताप यांची निवड झाल्यानंतर ज्येष्ठ संचालक मदन देवकाते यांनी निरावागज येथे सभा घेत जाहीर नाराजी व्यक्त केली होती.

दरम्यान, रविवारी कारखान्याचा अग्निप्रदीपन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमातही अध्यक्ष निवडीवरून सुरू झालेले नाराजीनाट्य कायम असल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर झालेल्या या पहिल्या निवडणुकीचा बारामती तालुक्याच्या राजकारणावर मोठा परिणाम होणार असल्याची चर्चा आहे.

Madan Devkate
Malegaon Sugar Factory News : माळेगाव कारखान्याने १० गावे जोडण्याचा निर्णय केला रद्द

कारखान्याच्या अध्यक्षपदी वर्णी लागावी म्हणून संचालक योगेश जगताप, ज्येष्ठ संचालक मदन देवकाते यांनी तगडी 'फिल्डिंग' लावली होती. अजितदादांनी मात्र ज्येष्ठ, अनुभवी म्हणून अॅड. जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. अॅड. जगतापांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर योगेश जगतापांनी त्यांना आपला पाठिंबा जाहीर केला. मदननानांनी मात्र आपल्या निरावागज गावातील चिंतन सभेत दुजाभाव केल्याचा आरोप करत नाराजी जाहीर केली. (Madan Devkate)

मदन देवकाते म्हणाले होते, गेल्या ४० वर्षांच्या राजकारणातील ३१ वर्षे कारखान्यासाठी काम केले. पक्षाने सांगितली ती भूमिका मन लावून पार पाडली. विरोधातील पॅनेल सत्तेत बसविण्यासाठी जिवाचे रान केले. विजयासाठी केलेल्या प्रयत्नांतून कुणालाही पदाची अपेक्षा असतेच. पक्षाशी कायम एकनिष्ठ राहूनही पद दिले जात नाही, यातूनच मनात प्रश्न निर्माण झाला, एका विशिष्ट समाजात जन्माला आलो म्हणून मला डावलले का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

मदन देवकातेंनी अजित पवारांना(Ajit Pawar) उद्देशून अनेक प्रश्न उपस्थित केले होते. आता माळेगावच्या बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रम अध्यक्ष केशव जगताप आणि त्यांच्या पत्नी शांताबाई जगताप यांच्या हस्ते पार पडला. या वेळी मदननाना मागील रांगेत बसले होते. बॉयलर प्रज्वलित करताना सर्व संचालक जवळ होते. यानंतर फोटोसेशनही झाले.

मात्र, मदन देवकाते यांनी चार हात लांब राहणेच पसंत केले. त्यांना इतर ज्येष्ठ संचालकांनी आग्रह केला तरी ते दूरच राहिले. या भूमिकेमुळे मदन देवकातेंच्या मनातील खदखद कायम असल्याचे बोलले जात आहे. देवकातेंची ही खदखद तालुक्यातील राजकारणावर परिणाम करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Madan Devkate
PCMC News : अजितदादांचा धसका; तक्रार येताच आयुक्तांनी छाटले करसंकलन विभागप्रमुखाचे पंख

याबाबत मदन देवकाते 'सरकारनामा'शी बोलताना म्हणाले, कारखान्याचा बॉयलर प्रज्वलन हा शुभ कार्यक्रम असतो. कार्यक्रमाला मी येण्यापूर्वीच काही मंडळी पुढच्या रांगेत बसली होती. मी कार्यक्रमाच्या ठिकाणी नारळ फोडला. नाराजी वगैरे असे काही नाही. कार्यकर्त्यांमध्ये तशी चर्चा होत असते. (Malegaon Sugar Factory News)

राजकारणात थोडे मागेपुढे होतच राहते. ही लोकशाही आहे, त्यामुळे प्रत्येकाचा आदर करणे आपले कर्तव्य आहे. दरम्यान, सर्व कार्यक्रमात नानांचा ओसंडून वाहणारा उत्साह या वेळी दिसला नसल्याची चर्चा मात्र उपस्थितांमध्ये होती.

(Edited By Deepak Kulkarni)

Madan Devkate
Nana Patole News : माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकरांनी उल्लेख केलेले 'दादा' कोण ? पटोलेंनी ठिणगी टाकली

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com