Nana Patole Sarkarnama
पुणे

Nana Patole : पुणे काँग्रेसच्या 'डीनर डिप्लोमसी'चा फज्जा

Pune Congress : पुणे काँग्रेसमधील रुसवेफुगवे जैसे थे, नाना पटोलेंचा पुढाकार वाया गेला

Sudesh Mitkar

Pune Political News :

पुणे काँग्रेसमध्ये मनोमिलन करण्याचा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा प्रयत्न फसल्याचे समोर आले आहे. पुणे काँग्रेसमध्ये अंतर्गत अनेक गट कार्यरत आहेत. त्यामुळे काँग्रेसमधील मतभेद वारंवार समोर येतात. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधले रुसवे-फुगवे दूर करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुढाकार घेत सर्व वरिष्ठ नेत्यांना एकत्रित करत डीनर-पे-चर्चा करण्याचे नियोजन आखले होते. पण डीनर डिप्लोमसीचा फज्जा झाला आहे.

पुणे काँग्रेस (Pune Congress) आणि अंतर्गत मतभेद हे काही वर्षांपासून समीकरण बनले आहे. पुणे काँग्रेसमधील अंतर्गत गट वारंवार एकमेकांसमोर उभे ठाकलेले पाहायला मिळतात. काँग्रेसच्या या अंतर्गत कलहाचा फटका यापूर्वी काँग्रेसला बसला आहे. त्यामुळे काँग्रेसमधील आजी-माजी पदाधिकारी, ज्येष्ठ नेते आणि युवा काँग्रेसचे नेते यांचे मनोमिलन घडवून आणण्यासाठी स्नेहभोजनाचे आयोजन नाना पटोलेंनी (Nana Patole) केले होते. यासाठी पुण्यातील प्रमुख 50 नेत्यांना निमंत्रण देण्यात आले होते.

दरम्यान, नुकताच काँग्रेसकडून (Congress) लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) इच्छुक असलेल्यांना अर्ज करण्याची विनंती करण्यात आली होती आणि तब्बल 20 जणांनी निवडणूक लढवण्याची इच्छा दाखवली. अशावेळी उमेदवारीवरून काँग्रेसमधील दोन गट एका एकमेकांसमोर ठाकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यापूर्वीच्या निवडणुकांमध्येदेखील काँग्रेसची गटबाजी प्रकर्षाने समोर आली होती. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आलेली असताना गटबाजी पक्षाला भारी पडू शकते.

मागील दोन लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाकडून काँग्रेसला मोठा पराभवाचा धक्का पचवावा लागला आहे. मागील दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एकीकडे भाजपने (BJP) पुण्याला आपले गड बनवले असताना काँग्रेसची शहरात पीछेहाट सुरू आहे. तसेच आगामी लोकसभेसाठी भाजपाकडून अनेक दिग्गज पुणे लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी रोखण्यासाठी पुढाकार घेतला असून त्याची जबाबदारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार उल्हास पवार (Ulhas Pawar) यांच्यावर सोपवली होती.

त्यानंतर उल्हास पवार यांनी काँग्रेसमधील नेत्यांमध्ये मनोमिलन घडवून आणण्यासाठी 23 जानेवारीला स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजिला होता. मात्र हे नियोजन फिस्कटले आहे.

काँग्रेसची डीनर-पे-चर्चा झालीच नसल्याचे समोर आले आहे. काँग्रेसनेत्यांना निमंत्रण देऊनही फारसे काँग्रेस नेते या डीनर पे चर्चेसाठी इच्छुक नसल्याचे समोर आले.

शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ही चर्चा व्हावी, यासाठी प्रयत्नशील होते. पण नेत्यांनी उत्सुकता न दाखवल्याने चर्चेचे नियोजन रद्द करावे लागले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसमधली दुफळी प्रकर्षाने समोर आली आहे. ही दुफळी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी किती घातक ठरते, हे आता पाहावे लागेल.

(Edited by Avinash Chandane)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT