Pune District Municipal Corporation : पुण्याच्या पूर्व भागासाठी नाही, तर आता 'या' तालुक्यात होणार जिल्ह्यातील तिसरी महापालिका!

Third Municipal Corporation of Pune District : लोकसंख्या आणि क्षेत्रफळाबाबतचा सविस्तर अहवाल पाठविण्याबाबतचा आदेश पुणे विभागीय आयुक्तांना मिळाला.
PMC
PMC Sarkarnama

Third Municipal Corporation of Pune District : वाढत्या नागरिकीकरणामुळे पुण्याच्या पूर्व भागासाठी हडपसर ही स्वतंत्र महापालिका करण्याच्या चर्चेने मध्यंतरी जोर धरला होता. त्यातून ठाण्यासारखी पुण्यातही एकाच जिल्ह्यात तिसरी महापालिका होणार होती. पण, आता त्याऐवजी उत्तर पुणे जिल्ह्यात ती करण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरू केल्या आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड आणि पुणे या दोन महापालिकांत आणखी काही नवीन गावांचा समावेश होण्याची शक्यता आता मावळली आहे.

खेड तालुक्यातील चाकण, आळंदी आणि राजगुरुनगर नगरपरिषदा एकत्र करून ही नवी महापालिका तयार करण्याचा राज्य सरकारच्या नगरविकास विभागाचा मानस आहे. पूर्वी या तिन्ही ठिकाणी ग्रामपंचायती होत्या. पण, वेगाने विकास झाल्याने तेथे नंतर नगरपरिषदा झाल्या. आता तर थेट महापालिका येऊ घातल्याने या भागाचा झपाट्याने विकास होण्यास मोठी मदत होणार आहे. Third Municipal Corporation of Pune District

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

PMC
Lok Sabha Election 2024 : कुख्यात गुंड गजा मारणे सपत्नीक पार्थ पवारांच्या भेटीला; कारण काय?

दरम्यान, महापालिका करण्यास स्थानिक लोकप्रतिनिधींचा त्यातही आपल्या अधिकारांवर गदा येणाऱ्या गावातील सरपंच, आमदार, खासदारांचा मोठा विरोध होण्याची शक्यताही आहे. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांत प्रशासकीय राजवट असल्याने नगरसेवकांचा तो होणार नाही.

चाकण आळंदी राजगुरुनगर या तिन्ही नगरपरिषदा आणि त्यांच्यालगतची गावे मिळून एक महापालिका करण्यासाठी लोकसंख्या आणि क्षेत्रफळाबाबतचा सविस्तर अहवाल पाठविण्याबाबतचा आदेश पुणे विभागीय आयुक्तांना राज्याच्या नगरविकास विभागाने बुधवारी दिला आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिका आयुक्त,पीएमआरडीए आयुक्त, पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ (मुख्य कार्यकारी अधिकारी), वरील तिन्ही नगरपरिषदांचे सीओ (मुख्याधिकारी) यांच्याकडून अहवाल मागविण्यास त्यांना सांगण्यात आले आहे. हा आदेश मिळाल्याला पिंपरी महापालिकेतून गुरुवारी दुजोरा देण्यात आला.

PMC
Maratha Reservation : पुण्यातील शंभर गावांसह राज्यातील अनेक गावे सर्वेक्षण ‘ॲप’मधून गायब

आमदार मोहितेंचा खेडच्या समावेशाला विरोध

आळंदी, चाकण नगरपरिषदा, लगतची गावे आणि एमआयडीसी मिळून नवी महापालिका तयार करा, अशी माझीच मागणी होती, असे यासंदर्भात खेडचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार) आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी सरकारनाामाला सांगितले. त्यामुळे सुविधा मिळतील, असे ते म्हणाले. मात्र, त्यात खेड नगरपरिषद नको, असेही त्यांनी स्पष्ट केले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com