पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) , विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यासह अनेक भाजप नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Abedkar) यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज पुण्यात हजेरी लावली. सिंबायोसिस संस्थेच्या डॉ. आंबेडकर संग्रहालय आणि स्मारकाला अभिवादन केलं. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना नारायण राणेंनी त्यांच्या केंद्रीय मंत्रीपदाचं गुपित सांगितलं आहे.
''माझा उल्लेख मी केंद्रात कॅबिनेट मंत्री आहे असा होतो, पण व्हाया देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)असा आहे. पण व्हाया देवेंद्र फडणवीस आम्हाला सांगितलं जातं की दिल्लीला जा आणि सुखी राहा. मी आदेश पाळला आणि भारतीय जनता पक्षात आदेश पाळतात. मीही आदेश पाळला आणि आज मी सुखी आहे, असे नारायण राणेंनी म्हटले आहे.
तसेच, महिन्याला पुण्यात येणारा माणूस आज चार महिन्यांनी पुण्यात आला, तुमच्या माझ्यातलं अंतर यांनी वाढवलं याला देवेंद्र फडणवीस कारणीभूत आहेत, असं राणेंनी म्हणताच फडणवीसांनी त्यांच्याकडे पाहून हात जोडले, आणि हे पाहून संपूर्ण सभागृहात एकच हशा पिकला. यानंतर त्यांनी हातातलं घड्याळ बीजेपीचं (BJP) नाही, राष्ट्रवादीच आहे, त्यामुळे आता थांबायला हवं, पुढे कार्यक्रम आहेत, असंही राणे म्हणाले.
दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरही प्रकाश टाकला. बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यात जे कामे केली, देशाची राज्यघटना लिहीली, त्या घटनेचं आज देशभरात कौतुक होत आहे. त्यामुळे आत्मनिर्भर होण्यासाठी बाबासाहेबांच्या विचारांच अनुकरण करा. बाबासाहेब आंबेडकर यांचा एक एक गुण आत्मसात केला तर अमेरिका आणि चीननंतर आपला देश महासत्ता होण्यापासून आपल्याला कोणाही थांबवू शकणार नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.