संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना पेंडॉल काढण्याचे आदेश...

परिवहन मंत्र्यांच्या आदेशावरून पेंडॉल काढणार असल्याचे गणेशपेठ पोलिसांनी (Ganeshpeth Police) सांगितले. ही कारवाई सुरू झाल्यानंतर संपकरी आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
S.T. Bus
S.T. BusSarkarnama
Published on
Updated on

नागपूर : गणेशपेठ बसस्थानकावर (Ganeshpeth Bus Stand) एस.टी. कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे, या मागणीसाठी कर्मचारी अडून बसले आहेत. अन् सरकार (Maharashtra Government) ती अट मानायला तयार नाही. अशात आज संपकरी ज्या पेंडॉलमध्ये बसून आंदोलन करीत आहेत, तो पेंडॉल काढून टाका, असे आदेश परिवहन मंत्र्यांनी (Minister of Transport) दिल्याची माहिती आहे.

आज काही वेळापूर्वी गणेशपेठ पोलिसांनी संपकऱ्यांना पेंडॉल काढण्याबाबत बजावले आहे. एक तासात पेंडॉल न काढल्यास पोलिस स्वतः पेंडॉल काढणार आहेत. कुणाच्या आदेशावरून ही कारवाई आहे, असे विचारले असता परिवहन मंत्र्यांच्या आदेशावरून पेंडॉल काढणार असल्याचे गणेशपेठ पोलिसांनी सांगितले. ही कारवाई सुरू झाल्यानंतर संपकरी आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिस पूर्ण खबरदारी घेऊन ही कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले.

एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. कृती समितीने देखील संपात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एसटीची चाकं जागेवरच थांबली आहेत. राज्यातील जवळपास २५० आगार बंद आहेत. याच संपाला भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा दिल्यामुळे तो आणखीनच चिघळल्याचा आरोप झाला. त्यामुळे हा संप मिटवणे सरकारसाठी एक आव्हानच बनले आहे. संपकरी सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत नसल्यामुळे आता सरकारकडून बळाचा वापर होण्याची शक्यता दिसू लागली आहे.

S.T. Bus
आंदोलन सुरुच ठेवा.. नवनीत राणांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

परिवहन मंत्री अनिल परब यांनी सुरुवातीला ही मोठी मागणी असून एक-दोन दिवसात पूर्ण होणारी नसल्याचे सांगत कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे आवाहन केले. त्यातच न्यायालयाने देखील हा संप बेकायदेशीर असल्याचे सांगितले. मात्र यानंतरही कर्मचाऱ्यांनी कामावर परतण्यास नकार देत संप सुरुच ठेवला. न्यायालयाने यावर तोडगा म्हणून कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी सरकारला अध्यादेश काढून समिती स्थापन करण्याचे आदेश दिले. त्यानुसार समिती स्थापन करण्यात आल्यानंतरही कर्मचारी संपावर ठाम राहिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com