Police escort the convicted accused in the Nasrapur rape and murder case as the Pune court delivers its verdict. The case drew widespread public outrage across Maharashtra. Sarkarnama
पुणे

Nasrapur Rape Case : नसरापूर अत्याचार प्रकरणात नराधम भीमराव कांबळे दोषी; कोर्टाने काय शिक्षा देऊ विचारताच म्हणाला, "मी पाय घसरून पडलो अन्..."

Nasrapur child rape murder case result : पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीच्या गुन्ह्यासाठी एका आरोपात फाशीची, दुसऱ्या गुन्ह्यात जन्मठेपेची तरतूद आणि तिसऱ्या गुन्ह्यात आजन्म कारावासाची तरदूत असल्याचं सांगितलं. दरम्यान, कोर्टात न्याय‍धीशांनी आरोपी कांबळेला "तू तो प्रसंग आठव आणि तुला काय शिक्षा द्यायची ते तूच सांग?" असा प्रश्न विचारला.

Jagdish Patil

Nasrapur Rape Murder Case : पुणे जिल्ह्यातील नसरापूरमध्ये 1 मे 2026 रोजी एका साडेतीन वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची संतापजनक घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी भीमराव कांबळे याला अटक केली होती.

या घटनेवर संपूर्ण राज्यभरातून संताप व्यक्त केला जात होता. त्यानंतर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घातलं होतं. त्यानंतर हे प्रकरणाची सुनावणी जलदगतीने सुरू करण्यात आली. त्यानुसार आता प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून आज (ता.25) या प्रकरणाचा निकाल लागणार आहे.

पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवलं आहे. कोर्टाने आरोपीच्या गुन्ह्यासाठी एका आरोपात फाशीची, दुसऱ्या गुन्ह्यात जन्मठेपेची तरतूद आणि तिसऱ्या गुन्ह्यात आजन्म कारावासाची तरदूत असल्याचं सांगितलं. दरम्यान, कोर्टात न्याय‍धीशांनी आरोपी कांबळेला "तू तो प्रसंग आठव आणि तुला काय शिक्षा द्यायची ते तूच सांग?" असा प्रश्न विचारला.

त्यावर "मी त्या दिवशी तिला गाठीशेव खायला घेऊन गेलो. मी पाय घसरून पडलो आणि तिच्या डोक्याला मार लागला. मी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला ती रडत होती," असा नवा बनाव आरोपीने केला. त्यानंतर कोर्टाने हा सर्व इतिहास असून तुझ्यावरचे गुन्हे सिद्ध झाले आहेत असं सांगितलं, त्यावर आरोपी निरूत्तर झाला.

तर सरकारी वकिलांनी यावेळी नराधम आरोपीला मृत्यूदंड देण्याची मागणी केली. भीमराव कांबळेला पश्चाताप नाही, दयेच्या लायकीचा तो नाही, ज्या मुलीने त्याच्यावर विश्वास ठेवला तिच्यावर त्याने ३९ मिनिटं घृणास्पद प्रकार केल्याचा युक्तीवाद यावेळी सरकारी वकिलांनी कोर्टात सुनावणी दरम्यान सांगितलं. त्यामुळे त्याला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी केली जात आहे.

नेमकं प्रकरण काय?

नसरापूर मध्ये महाराष्ट्र दिनी म्हणजेच 1 मे 2026 ला साडेतीन वर्षांच्या एका मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. आजोळी राहायला आलेल्या या मुलीला या व्यक्तीने जवळच्या गोठ्यात नेलं होतं. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली.

मुलगी सापडत नाही म्हणून नातेवाईकांनी तिचा शोध घेतला असता तिचा मृत देह जवळच्या गोठ्यात आढळला. त्यानंतर तिच्यावर अत्याचार झाल्याचं तपसातून समोर आलं होतं. या घटनेचे पडसाद पुण्यासह संपूर्ण राज्यात उमटले होते. समाजाचा संताप बघता हे प्रकरणाची जलदगतीने सुनावणी करण्यात आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT