Swarajya Rakshak Sambhaji Maharaj Sarkarnama
पुणे

Pune News : राष्ट्रवादीने भाजपला पुन्हा डिवचले : पुण्यात पुन्हा ‘स्वराज्य रक्षक संभाजी महाराज’ अशी बॅनरबाजी

संभाजी महाराजांच्या राज्यभिषेक सोहळा दिनानिमित्त ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhajiraje) यांना स्वराज्य रक्षक (Swarajya Rakshak) म्हणायचे की धर्मवीर यावरून राज्यात वाद सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) पुण्यात (Pune) पुन्हा स्वराज्य रक्षक संभाजी महाराज असे बॅनर लावण्यात आले आहेत. संभाजी महाराजांच्या राज्यभिषेक सोहळा दिनानिमित्त ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. यातून राष्ट्रवादीनं भाजपला (BJP) डिवचल्याचं मानले जात आहे. (NCP again put up the banner 'Swarajya Rakshak Sambhaji Maharaj' in Pune)

हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात भाषण करताना संभाजी महाराजांना धर्मवीर नव्हे तर स्वराज्य रक्षक म्हणावे, अशी सूचना केली होती. त्यावरून भारतीय जनता पक्षाने पवार यांच्या विरोधात राज्यभरात आंदोलन केले होते. त्यानंतरही अजित पवार आपल्या म्हणण्यावर ठाम आहेत. पुण्यात राष्ट्र्रवादीकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले होते.

दरम्यान, संभाजी महाराज यांच्या राज्यभिषेक सोहळा दिनानिमित्त आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुणे शहरात पुन्हा बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यावर स्वराज्य रक्षक संभाजी महाराज असा उल्लेख आहे. पुण्यातील डेक्कन चौकात असलेल्या संभाजी महाराज पुतळ्याजवळ ही बॅनरबाजी केलेली आहे.

संघ प्रवृत्तीच्या लोकांचा विरोध

स्वराज्य रक्षक संभाजी महाराज असे बोर्ड लावायला संघ प्रवृत्तीच्या लोकांनी रविवारी विरोध केला होता, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे.

विश्व हिंदू मराठा परिषदेकडून धर्मवीर असा उल्लेख

छत्रपती संभाजी महाराज यांचा आज राज्याभिषेक सोहळा दिवस आहे, त्यानिमित्ताने पुण्यातील डेक्कन येथील संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आलेल्या विश्व हिंदू मराठा परिषदेने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज नगर पुणे असा बोर्ड पुतळ्यासमोर लावला आहे. फुलांनी धर्मवीर असं लिहून अभिवादन केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT