पुणे

Ajit Pawar : "राणेंना बाईनं पाडलं…" अजितदादांचा video व्हायरल, राऊत म्हणाले, "दादा म्हणजे कमाल की चीज.."

सरकारनामा ब्युरो

Ajit Pawar Attacks on BJP Narayan Rane : विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी काल (गुरुवारी) प्रचारसभेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे.

अजित पवार यांच्या भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.नारायण राणे यांच्यावर भाषण करताना अजितदादांनी केलेले हातवारे, मिश्किल टीका यांची सध्या चर्चा होत आहे.

अजितदादांनी शिवसेनेतून फुटलेल्या नेत्यांवर हल्लाबोल केला. नारायण राणे यांचे उदाहरण देताना अजितदादांनी नारायण राणेंची खिल्ली उडवली.

"आत्तापर्यंत शिवसेना फोडणाऱ्यांचा विजय झालेला नाही. त्यांना जनतेने जागा दाखवलेली आहे. भुजबळांसहीत सगळ्यांना पाडण्याचे काम केले. नारायण राणेंना तर दोनदा पाडले. एकदा कोकणात आणि दुसऱ्यांदा मुंबईत एका महिलेने पाडले. बाईने पाडले.. बाईने..," असे म्हणत अजितदादांनी सभेत धमाल उडवून दिली.

'नारायण राणे यांना बाईनं पाडलं… बाईनं'असे म्हणताना अजितदादांनी केलेल हातवारे पाहण्यासारखे आहेत. अजित पवार म्हणाले, " शिवसेना फोडणाऱ्यांचा विजय झालेला नाही. त्यांना मतदारांनी जागा दाखवली आहे. छगन भुजबळ यांच्यासहीत सगळ्यांना पाडण्याचे काम केले,"

अजितदादांचा हा व्हिडिओ ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टि्वट करीत कौतुक केलं आहे. " दादा म्हणजे कमाल की चीज आहेत," असे म्हणत संजय राऊतांनी आनंद व्यक्त केला आहे. 'दादा म्हणजे कमाल आहे. कमाल की चीज! नेता असाच असतो एकदम मोकळा ढाकळा! सहज सोप्या भाषेत थेट संदेश! जय महाराष्ट्र' असे टि्वट राऊतांनी केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT