Congress : मोठी बातमी : काँग्रेस वर्किंग कमिटीच्या निवडणुकीबाबत महत्वाचा निर्णय ; २३ सदस्यांच्या निवडीचा अधिकार..

Congress National Working Committee Raipur : काँग्रेसच्या घटनेत मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
Congress
CongressSarkarnama

Congress National Working Committee Raipur : छत्तीसगडमधील रायपूरमध्ये आजपासून काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाला (Congress Session Raipur) सुरुवात झाली आहे. तीन दिवसांचे हे राष्ट्रीय अधिवेशन आहे.

या अधिवेशनात विविध विषयावर चर्चा होत आहे. आज सकाळी काँग्रेस सुकाणू समितीची (Congress Steering Committee)बैठक झाली. यात काही मोठे निर्णय झाल्याची माहिती आहे.

काँग्रेस वर्किंग कमिटीसाठी निवडणूक होणार नसल्याचा मोठा निर्णय या अधिवेशनात घेण्यात आला. काँग्रेस वर्किंग कमिटीच्या २३ सदस्यांची निवड करण्याचा अधिकार अध्यक्ष मलिक्कार्जुन खर्गे यांना देण्यात येणार आहे.

Congress
Meghalaya Election 2023 : मोदींच्या रॅलीला मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात नकार ; भाजपला दणका

रायपूर अधिवेशनात याबाबत सहमतीने निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.यानिमित्ताने काँग्रेसच्या घटनेत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. अध्यक्षपदासाठी निवडणुकीनंतर वर्किंग कमिटीच्याही निवडणुका घेण्याची मागणी होती.

या अधिवेशनात 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची काय रणनीती असणार यावर चर्चा होणार आहे. भाजपविरोधी प्रादेशिक पक्षांना सोबत घेण्यासंदर्भात काँग्रेसकडून काही संकेत दिले जाणार का? याबाबत चर्चा होणार आहे. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर देखील या अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या वादाच्या पार्श्वभूमीवर रमेश चेल्लीनाथ समितीचा अहवाल सादर होणार का, याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.देशातील काही राज्यांमध्ये यंदा विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या संदर्भात अधिवेशनात चर्चा होणार असल्याचे समजते.

नाना पटोले यांना हटवा आणि आदिवासी नेते शिवाजी मोघे यांना प्रदेशध्यक्षपद द्या, अशी मागणी काँग्रेसच्या २१ नेत्यांनी निरीक्षक रमेश चिन्निथाला यांच्याकडे केलीय. प्रदेश काँग्रेस सचिव खान नायडू, सदस्य प्रदेश काँग्रेस कमिटी प्रकाश मुगदीया, सरदार महेंद्र सिंग सलूजा, इक्राम हुसैन यासोबत २१ पदाधिकाऱ्यांनी रमेश चिन्निथाला यांची भेट घेतली आहे. नाना पटोले यांना हटवण्याची मागणी करण्यासाठी, हे नेते हायकमांडला भेटण्यासाठी रायपूर येथे आले आहेत.

Congress
Thackeray group : ‘गद्दार’, 'खोके' शब्द रुजविल्यानंतर ठाकरे गट पुन्हा आक्रमक ; पण, आमदारांची अनुपस्थिती..

या वर्षी ९ राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहे. त्यापैकी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ या राज्यांमध्ये काँग्रेसला थेट भाजपविरोधात लढाई लढावी लागणार आहे. या राज्यांमध्ये काँग्रेसला यश मिळाले तर या राज्यांमध्ये सत्ता मिळेलच, शिवाय, त्याचा लाभ लोकसभा निवडणुकीतही होईल.

या तीन राज्यांत मिळून लोकसभेच्या ६५ जागा आहेत. त्यामुळे प्रादेशिक पक्षांशी स्पर्धा करण्यापेक्षा भाजपविरोधातील जागांवर लक्ष केंद्रीत करावे. दीडशे जागांपर्यंत काँग्रेसने मजल मारली तरी देशातील राजकीय परिस्थितीमध्ये आमूलाग्र बदल झालेला दिसेल. हा संदेश विरोधी पक्षांपर्यंत पोहोचवला तर त्यांचेही काँग्रेसलाही सहकार्य मिळू शकेल. त्यातून महाआघाडी उभी राहील असे काँग्रेसमधील नेत्यांकडून सुचवले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com