Devendra Fadnavis Sarkarnama
पुणे

Pune Politics : पुण्याच्या राजकारणात मोठा भूकंप; CM फडणवीस यांच्या दौऱ्यानंतर 2 दिवसांतच भाजपमधील 'स्ट्रॉंग इन्कमिंग'ची यादी तयार

BJP Pune Political Leaders Entry : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये भाजप मोठा राजकीय उलटफेर घडवून आणण्याच्या तयारीत आहे. भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग होणार असून यामध्ये काँग्रेससह महायुतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी आणि आरपीआय पक्षाला देखील धक्के बसणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Sudesh Mitkar

Pune News, 14 Oct : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये भाजप मोठा राजकीय उलटफेर घडवून आणण्याच्या तयारीत आहे. भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग होणार असून यामध्ये काँग्रेससह महायुतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी आणि आरपीआय पक्षाला देखील धक्के बसणार असल्याचं सांगितलं जात आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच पुण्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राची बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील वरिष्ठ भाजपनेते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीमध्ये पुण्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.

त्यानंतर माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट करत पक्षांमध्ये स्ट्राँग उमेदवारांना प्रवेश देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केलं होतं. एक प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी इन्कमिंगच्या प्रतीक्षेत असलेल्या इच्छुकांना ग्रीन सिग्नल दिला होता.

देवेंद्र फडणवीस यांना ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर आता पक्षप्रवेशाच्या प्रक्रियेला गती मिळाली असून लवकरच भाजपमध्ये मोठे प्रवेश घडवून येणार आणण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. तब्बल 15 प्रवेश येत्या दिवाळीपूर्वीच घडून आणण्यात येणार असल्याचं सांगितलं जात असून याबाबतची यादी देखील तयार करण्यात आली आहे.

यादीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसणारा असून काँग्रेसमध्ये जे नाराजीचे वातावरण तो त्याचा फटका काँग्रेसला बसताना पाहिला मिळत आहे. गटबाजीचा फटका काँग्रेसला बसला असून काँग्रेसमधून पाच ते सहा माजी नगरसेवकांसह मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.

त्यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतूनही 1 ते 2 माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असून या पक्षातून इतर मोठे चार ते पाच प्रवेश भाजपमध्ये होणार आहेत. यासोबतच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या पक्षातून देखील एक बडा नेता. भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

या 15 जणांमध्ये कोणकोणती नाव आहेत याबाबतच्या यादीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे, असं असलं तरी भाजपकडून मात्र अद्याप पर्यंत कोणत्याही राजकीय प्रवेशाबाबत अधिकृत असं विधान करण्यात आलेल नाही. तसेच याबाबत बोलायला देखील भाजप नेते तयार नाहीत. मात्र एकूणच भाजपने आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा राजकीय भूकंप करण्याची तयारी केली असल्याचं पाहायला मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT