Ajit Pawar: मुरलीअण्णांना पुढे जाऊ द्या! अजितदादांच्या साम्राज्यावर भाजपचा दावा

Maharashtra Olympic Association election 2025: महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप खासदार तथा केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने अजित पवार यांना या निवडणुकीतून माघार घेण्याची विनंती केली आहे.
Maharashtra Olympic Association election 2025
Maharashtra Olympic Association election 2025Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : महायुती म्हणून राज्य सरकारमध्ये एकत्र असताना देखील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अनेक राजकीय निर्णयावरून एकमेकांच्या आमने-सामने उभे ठाकले असल्याचं अनेकदा पाहायला मिळाले आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भाजप अनेक ठिकाणी आमने-सामने ठाकणार आहेत. त्यापूर्वी आणखीन एका निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पुण्याचे खासदार केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आमने-सामने येणार आहेत.

या निवडणुकीपूर्वीच भाजपने अजित पवार यांना माघार घेण्याची विनंती केली आहे. 2 नोव्हेंबरला ही निवडणूक होणार आहे. त्यापूर्वीच राजकीय वातावरण तापले आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप खासदार तथा केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने अजित पवार यांना या निवडणुकीतून माघार घेण्याची विनंती केली आहे.

भाजप नेते आणि महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “क्रीडा संघटनांवर माजी खेळाडूंनाच राहू द्या, राजकारण तिथे आणू नका. अजित पवार यांच्या मागील तीन कार्यकाळात महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्राचं मोठं नुकसान झालं असून त्यांच्या समितीने खर्चाचा हिशोब देखील दिलेला नाही.” असा आरोप तडस यांनी केला आहे.

“अजितदादांनी या निवडणुकीतून बाजूला व्हावं, जेणेकरून माजी खेळाडू असलेले मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली क्रीडा क्षेत्राचा विकास साधता येईल,” असे तडस म्हणाले. राज्याच्या क्रीडा क्षेत्रातील नेतृत्वाच्या या निवडणुकीमुळे आता राजकारण आणि क्रीडा क्षेत्र यांचा संघर्ष उफाळून आला आहे. काही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली असल्याचे बोलले जात आहे.

Maharashtra Olympic Association election 2025
ZP election : झेडपीच्या झिरो आरक्षणामुळे वंचित पुन्हा होणार वंचित?
  • अर्ज भरण्याची मुदत सुरू झाल्यावर तातडीने अजितदादांनी अध्यक्षपदासाठी अर्ज भरला.

  • खो-खो संघटनेकडून त्यांनी हा अर्ज दाखल केला आहे.

  • महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष म्हणून पवार यांच्या चार वर्षांचे तीन कार्यकाळ पूर्ण झाले आहेत.

  • घटनेनुसार पवार निवडणुकीसाठी अपात्र ठरत असताना त्यांचाच अर्ज सर्वप्रथम आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

  • अर्ज भरण्याची मुदत ११ ऑक्टोबर रोजी संपणार आहे.

  • छाननी आणि त्यावरील आक्षेपाची चौकशी १४ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.

  • पात्र उमेदवारांची यादी १४ ऑक्टोबर रोजी जाहीर केली जाईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com