Pimpri Chinchwad Office bearer of NCP Sarkarnama
पुणे

NCP Pimpri-Chinchwad : बालेकिल्ला राखण्याचं अजितदादांचं लक्ष्य; गव्हाणेंच्या दिमतीला तब्बल पाच कार्याध्यक्षांची 'टीम'

Sharad Pawar Vs Ajit Pawar Group In Pimpri-Chinchwad : अजित गव्हाणेंची अजितदादांकडून पुन्हा शहराध्यक्षपदी निवड

सरकारनामा ब्यूरो

Sharad Pawar Vs Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला साथ देणाऱ्या बंडखोर पदाधिकाऱ्यांवर शरद पवार गटाकडून तडक कारवाईचा बडगा उगारला जात आहे. पवार गटाने केलेल्या कारावाईनंतर २४ तासातच संबंधित पदाधिकाऱ्यांना पुन्हा त्याच पदावर नियुक्ती अजित पवार गटाकडूनही केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील पदाधिकाऱ्यांवरून सुरू असलेली चुरस आता पिंपरी-चिंडवडमध्येही पाहायला मिळात आहे. (Latest Political News)

पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची शरद पवार गटाकडून मंगळवारी (ता. १८) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हकालपट्टी केली होती. त्यांना २४ तासांच्या आतच पुन्हा त्यांच्या मूळ पदावर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज बुधवारी (ता.१९) नियुक्त केले आहे. गव्हाणे यांच्यासह इतर चार कार्याध्यक्षांचीही साहेबांचा गटाने हकालपट्टी केली होती. त्यांनाही पुन्हा त्याच पदावर सामावून घेण्यात आले आहे.

चार कार्याध्यक्ष असतानाही अजित पवार गटाने आता पिंपरी-चिंचवड शहरासाठी आणखी एका नव्या कार्याध्यक्षाची निवड केली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या गटाचा पिंपरी चिंडवड शहरात एका अध्यक्षासह एकूण पाच कार्याध्यक्ष कामाला लागले आहेत. यात राहुल भोसले, जगदीश शेट्टी, प्रशांत शितोळे, फजल शेख आणि नवे कार्याध्यक्ष शाम लांडे यांचा समावेश असणार आहे. या माध्यमातून अजित पवार यांनी आपला गड राखण्यासाठी व्यूहरचना आखल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

अधिवेशनानंतर पावर घेणार शहराचा आढावा

पिंपरी चिंचवड अजित पवार गटाचे नवनियुक्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले, "राज्य शासनाच्या माध्यमातून शहर विकासाची अधिकाधिक कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न असेल. अजितदादा सत्तेत असल्याने शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यास आता आणखी वेग येईल. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच अजितदादा अधिवेशन संपताच शहरात येणार आहेत. त्यावेळी ते विकासकामांचा आढावा घेणार आहेत. तसेच त्याच दिवशी पक्षाचा मेळावाही होणार आहे."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT