NCP Pimpri-Chinchwad : साहेबांनी हकालपट्टी केलेल्या गव्हाणेंची अजितदादांनी 24 तासातच केली नियुक्ती

Sharad Pawar Vs Ajit Pawar Group In Pimpri-Chinchwad शरद पवार गटाकडून बडतर्फ केलेल्या पदाधिकाऱ्यांची अजित पवार गटाकडून नियुक्तीचा सपाटा
Pimpri Chinchwad Office bearer of NCP
Pimpri Chinchwad Office bearer of NCPSarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar Vs Ajit Pawar : बंडखोर गटाला साथ देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांवर शरद पवार गटाकडून तडक कारवाईचा बडगा उगारला जात आहे. पवार गटाने केलेल्या कारावाईनंतर २४ तासातच संबंधित पदाधिकाऱ्यांना पुन्हा त्याच पदावर नियुक्त करण्याचा सपाटा अजित पवार गटाकडून सुरू असल्याचे दिसून येत आहे. पिंपरी-चिंडवडमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील पदाधिकाऱ्यांवरून सुरू असलेली चुरस पाहायला मिळाली. (Latest Political News)

पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची शरद पवार गटाकडून मंगळवारी (ता. १८) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हकालपट्टी केली होती. त्यांना २४ तासांच्या आतच पुन्हा त्यांच्या मूळ पदावर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज बुधवारी (ता.१९) नियुक्त केले आहे. मुंबईत अजित पवारांच्या उपस्थितीत गव्हाणेंना नियुक्तीचे पत्र तटकरे यांनी दिले. यावेळी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक पंकज भालेकर, राहुल भोसले, शाम लांडे, प्रभाकर वाघेरे, प्रसाद शेट्टी आदी उपस्थित होते.

Pimpri Chinchwad Office bearer of NCP
Manipur Viral Video : 'आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी..' ; मणिपूर घटनेवर मुख्यमंत्री बिरेन सिंहांचे मोठे विधान!

बडतर्फीची अशीच कारवाई अजित पवारांना साथ देणाऱ्या पिंपरी-चिंचवडच्या महिला अध्यक्षा प्रा. कविता आल्हाट यांच्यावर शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी केली होती. त्यांनाही दुसऱ्या दिवशीच अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी याच पदावर नियुक्ती केली होती. त्याची पुनरावृत्ती सहा दिवसांतच शहर अध्यक्षांबाबतीत झाली आहे.

Pimpri Chinchwad Office bearer of NCP
Dheeraj Ghate News : पक्षासाठी धीरज घाटेंकडे पुण्याची जबाबदारी; कशी पेलणार आव्हाने ?

अधिवेशनानंतर पावर घेणार शहराचा आढावा

पिंपरी चिंचवड अजित पवार गटाचे नवनियुक्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले, "राज्य शासनाच्या माध्यमातून शहर विकासाची अधिकाधिक कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न असेल. अजितदादा सत्तेत असल्याने शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यास आता आणखी वेग येईल. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच अजितदादा अधिवेशन संपताच शहरात येणार आहेत. त्यावेळी ते विकासकामांचा आढावा घेणार आहेत. तसेच त्याच दिवशी पक्षाचा मेळावाही होणार आहे."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com