yogi baba bulldozer  Sarkarnama
पुणे

Pune Police: पुणे पोलिस गिरवणार योगी आदित्यनाथांचा कित्ता

Mangesh Mahale

पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणी आतापर्यंत 15 जणांना अटक केली असून काही संशयीत आरोपींचा पुणे पोलिस शोध घेत आहेत. आंदेकरांच्या खुनानंतर पुण्यातील सराईत गुन्हेगारांच्या मालमत्तेची माहिती पोलिस घेत आहेत. ज्या गुन्हेगारांनी अतिक्रमण करुन घरे बांधली आहे, अशा घरांवर पोलिस लवकरच कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहेत. याबाबत माहिती संकलित करण्यास पुणे पोलिसांनी सुरुवात केली आहे.

उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काही महिन्यापासून बुलडोझर कारवाईमुळे चर्चेत आहेत. मोठ्या गु्ह्यातील आरोपींच्या अनधिकृत घरांवर बुलडोझर फिरवण्यात आल्याचं उत्तर प्रदेशातून समोर आलं होतं. तोच कित्ता आता पुणे पोलिस गिरवणार आहेत.पोलिस आयुक्त अमितेश कुमार हे उत्तरप्रदेशातील 'योगी पर्टन'पुण्यात राबवणार आहेत.

पुण्यातील गुन्हेगारांच्या टोळ्या संपवण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. वनराज यांच्या खुनात सहभागी असलेल्या प्रमुख आरोपींचे गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. त्यांना अद्दल घडविण्यासाठी त्यांच्या बेकायदा घरावर बुलडोझर फिरविण्याची तयारी पोलिसांनी केली आहे.

"ज्या गुन्हेगारांनी आपली घरे बेकायदा पद्धतीने बांधली आहेत, त्यांच्यावर आता बुलडोझर चालविला जाणार आहे. याबाबत माहिती संकलित केली जात आहे. नियमांच्या चौकटीत राहून ही कारवाई केली जाणार आहे. "तुम्ही बदमाश असाल तर पोलिसदेखील शरीफ नाहीत, हे आम्ही दाखवून देऊ," असा दम अमितेश कुमार यांनी गुन्हेगारांना भरला आहे.

अमितेश कुमार म्हणाले, "वनराज यांचा खून केल्यानंतर, किंवा खुनाच्या पूर्वी प्रमुख आरोपींच्या संपर्कात असलेल्या व्यक्ती पोलिसांच्या रडारवर आहेत. आरोपींना पैसे पुरवणे त्यांना पळून जाण्यास मदत केल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यांना या गुन्ह्यात आरोपी केले जाणार आहे,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT